पूजा सावंत आणि बिगबींच्या जाहिरात मधील ‘ही’ मोठी चूक लोकांनी पकडली, होत आहेत मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’

पूजा सावंत आणि बिगबींच्या जाहिरात मधील ‘ही’ मोठी चूक लोकांनी पकडली, होत आहेत मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियावर सक्रीय असलेले युझर्स काहीही घटना घडली तरी त्याबद्दलच्या ताज्या नोंद तत्परतेने शेअर करत असतात. हे युझर्स प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून असतात. मग त्यांची चाणाक्ष नजर व्यक्ती असो वा त्यांचे फोटो चूक शोधण्यात तरबेज असतात.

असाच अनुभव महानायक अमिताभ बच्चन यांना देखील आला आहे. सोशल मीडियावरील युझर्सने बिग बी यांनी केलेल्या जाहिरातीमधील एक चूक शोधून काढली. जाहिरातीच्या फोटोमधील झालेली चूक निदर्शनास आल्यानंतर ती व्हायरल झाली असून त्यावर इतर युझर्स कमेन्ट करू लागले आहेत.

काय आहे चूक

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या जाहिरातीच्या फोटोमध्ये त्यांचा हात फोटोशॉप करून वापरण्यात आला आहे. खरे तर ही अतिशय साधी गोष्ट आहे. परंतु जाहिरातीमध्ये झालेली ही चूक युझरने शोधून काढली आणि तातडीने सोशल मीडियावर शेअर केली. बघता बघता जाहिरातीमधील ही चूक कमालीची व्हायरल झाली आणि त्यावर युझर्स कमेन्ट करू लागले.

अनेकांनी या चुकीवर भाष्य केले आणि त्या युझरच्या चाणाक्षपणाचे कौतुक केले आहे. एका युझरने लिहिले की ‘अशी चाणाक्ष नजर प्रत्येकाकडे नसते.’ अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या जाहिरातीमधील चूक @yadsul या युझरने शोधून काढली. त्या युझरने ही चूक सोशल मीडियावर शेअरही केली.

या जाहिरातीचा फोटो शेअर करत या युझरने लिहिले की, ‘कुणी बारकाईने पाहिले आहे का वडिलांचा हात किती लांबपर्यंत जाऊ शकतो. हे अशासाठी आहे कारण ही मॉडेल कुणी फिल्मस्टार नाही. बिग बींना तिच्यासोबत पोझ देण्याची इच्छा नव्हती! फोटोशॉप साठी १० पैकी १ मार्क… हा १ मार्क देखील त्या मॉडेलच्या आत्मविश्वासासाठी आहे.’

तर त्यावर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘हे कायद्याचे हात आहेत.’ एका युझरने लिहिले की, ‘माझ्या मते ही जाहिरात महाराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी आहे. या जाहिरातीमध्ये असलेली मॉडेल ही मराठी सिनेमातील अभिनेत्री पूजा सावंत आहे. अर्थात ही जाहिरात अतिशय वाईट पद्धतीने एडिट करण्यात आली आहे.’

Team Hou De Viral