धक्कादायक ! ह्या बाईने बिगबॉस च्या घरात आणलाय मोबाईल..?

धक्कादायक ! ह्या बाईने बिगबॉस च्या घरात आणलाय मोबाईल..?

कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हा शो सुरु झाला आहे. मात्र या शोवर प्रेक्षक चांगलेच संतापले असल्याचे दिसत होते.

कारण की या शोचे प्रमोशन करण्यासाठी जो प्रोमो तयार करण्यात आला होता, तो अतिशय घाणेरड्या पद्धतीने तयार करण्यात आला. त्यामुळेच प्रेक्षकाच संतापले असल्याचे पाहायला मिळाले होते. बिग बॉसच्या चौथ्या पर्वमध्ये दिग्गज असे सेलिब्रिटी कोणीही सहभागी झाले नाही, असे म्हटले तर वावगे ठरवू नये.

कलर्स मराठी वर पहिला बिग बॉसचा शो सुरू झाला होता त्यावेळेस या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. त्यानंतर सलग तीन शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले. चौथ्या शोचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव हा करणार असे सांगण्यात येत होते.

मात्र, सिद्धार्थ जाधव याची काही वर्णी या शोच्या सूत्रसंचालकाच्यापदी लागली नाही, तर महेश मांजरेकर आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉसच्या घरामधून आता नुकताच एक अभिनेता बाहेर पडला आहे. या अभिनेत्याचे नाव निखिल राज शिर्के असे आहे. निखिल हा घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेक स्पर्धकांना आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती.

निखिल याचा खेळ काही चांगला झाला नाही. त्यामुळे त्याला घराच्या बाहेर जावे लागले. बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा नेमळेकर ही देखील सहभागी झाली आहे. अपूर्वा नेमळेकर ही सहभागी झाली त्या दिवसापासूनच वादात अडकली आहे. कारण पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर हिने प्रसाद जवादे यांच्यासोबत प्रचंड भांडण केले होते. त्यानंतर या जोडीची चर्चा झाली होती.

त्याचप्रमाणे अपूर्वा नेमळेकर हिने किरण माने यांना देखील आयोग्य भाषेत बोलल्याचे समोर आले होते. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी देखील तिला चांगलेच धारेवर धरले होते. आता देखील अपूर्वा नेमळेकर हिच्या बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

याचे कारण म्हणजे अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसच्या घरामध्ये मोबाईल घेऊन गेली आहे का? असा प्रश्न तिच्या चहात्यांना पडला आहे आणि याबाबत अनेकांनी तसे प्रश्न देखील विचारले आहेत. कारण अपूर्वा नेमळेकर ही घरामध्ये जे कपडे घालते तेच कपडे तिच्या सोशल मीडियावर शेअर होतात.

त्यामुळेच महेश मांजरेकर यांचे या प्रकाराकडे लक्ष नाही का? अशी विचारणा काही चाहत्यानी केली आहे. मात्र त्यानंतर यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, अपूर्वा नेमळेकर हिने जे कपडे बिग बॉसच्या घरात मध्ये नेले आहेत त्याचे चित्रिकरण आधीच करून ठेवले होते. आता अपूर्वा नेमळेकरची टीम सोशल मीडियावर त्या दिवशीचे फोटो शेअर करत असते.

त्यामुळे घरातील कपडे आणि तिच्या सोशल मीडियावरील कपडे एकच असतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तिने कुठलाही मोबाईल बिग बॉसच्या घरात नेला नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Hou De Viral