‘बिगबॉस मराठी’ मध्ये सहभागी झालेले हे 2 स्पर्धक पहिल्यापासून आहेत एकमेकांचे ‘कट्टर दुश्मन’

‘बिगबॉस मराठी’ मध्ये सहभागी झालेले हे 2 स्पर्धक पहिल्यापासून आहेत एकमेकांचे ‘कट्टर दुश्मन’

बिग बॉसच्या घरामध्ये सध्या अनेक जणांची भांडणे होताना दिसत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर हे पुरते वैतागलेले आहेत. आठवड्याच्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी अलीकडे अपूर्वा नेमळेकर हिच्यासह मेघा घाडगे हिला देखील चांगलेच सुनावले होते. त्यानंतर त्यांनी सांगितले होते की, तुम्ही जरा चांगला खेळ खेळा.

नाहीतर प्रेक्षक तुम्हाला बाहेर काढतील. यात माझे काहीच जाणार नाही. तुमचच नुकसान होईल, असे सांगितले होते. बिग बॉस देखील हे सगळं काही पाहत आहेत, असे त्यांनी सांगितले होते. तर बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर हिने प्रसाद जवादे याच्यासोबत वाद घातल्याचे आपण पाहिले. आता देखील अपूर्वा नेमळेकरच्या बाबतीतला एक किस्सा समोर आला आहे.

अपूर्व नेमळेकर हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. अपूर्वा नेमळेकर हिला आपण रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये काम केले होते. या मालिकेचे तब्बल एक दोन नाहीतर तीन भाग प्रकाशित झाले आहेत. अपूर्वा नेमळेकर हिने रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त काम केले होते. शेवंताची तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

आता बिग बॉसच्या सीजन चार मध्ये अपूर्वा नेमळेकर ही सहभागी झाली आहे. अपूर्वा नेमळेकर हिचा सुरुवातीलाच प्रसाद जवादे याच्यासोबत प्रचंड वाद झाल्याचे आपण पाहिले तर अपूर्वा नेमळेकर हिच्या बाबतीतला आता एक व्हिडिओ नुकताच व्हायरल आहे. या व्हिडिओमध्ये अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या सहकारी स्पर्धकांसोबत बोलताना दिसत आहे.

प्रसाद जवादे आणि मी पहिले पासूनच एकमेकांना ओळखतो. त्यामुळे त्याला पाहिल्यानंतर माझा पारा चांगलाच वाढला होता. कारण आम्ही दोघेही एकमेकांना सुरुवातीपासून ओळखतो. एका मालिकेच्या चित्रीकरण दरम्यान आमची भेट झाली होती. त्यानंतर प्रसाद यांनी मला थेट असे सांगितले होते की, आता तू काय कर माझे सिरीयल लवकरच येणार आहे.

त्यानंतर आता तू लग्न करून घे आणि साडेसातला माझी सिरीयल पहात बस असे म्हटले होते. त्यावेळेस मी काहीच त्याला बोलले नाही. कारण रात्रीस खेळ चाले या मालिकेचे माझे चित्रीकरण सुरू होते. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मी त्याला फोन केला आणि सांगितले की, आता तू लग्न कर आणि आपल्या मुलासोबत माझी मालिका पाहत बस.

कारण तुझ्या साडेसातच्या मालिकेच्या समोर माझी सिरीयल आता सुरू होणार आहे. ही सिरीयल पाहिल्यानंतर तुला मी काय आहे ते कळेल, असे अपूर्वा हिने त्याला त्यावेळेस सांगितले होते, असे अपूर्वा हिने आपल्या सहकारी कलाकारांना सांगितले. तर आता बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांचा वाद पुढे किती सुरू राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Hou De Viral