‘Bigg Boss Marathi 4’ च्या घरात पहिल्याच दिवसापासून ‘या’ दोघांच सुरू झालं ‘लफडं’

‘Bigg Boss Marathi 4’ च्या घरात पहिल्याच दिवसापासून ‘या’ दोघांच सुरू झालं ‘लफडं’

कलर्स मराठी वर बिग बॉसचे चौथी सत्र नुकतेच सुरू झाल्याचे आपण पाहत आहोत. 2 ऑक्टोबर रोजी या शोचा शुभारंभ झाला. महेश मांजरेकर हेच या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. पहिल्या दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याच्या आपण पाहिले आहे.

मात्र आता या शोमध्ये प्रेमप्रसंग देखील घडताना दिसत आहेत याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. बिग बॉसच्या घरात देखील अनेकदा खूप मोठ्या प्रमाणात भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी हिंदी मध्ये झालेल्या बिग बॉस मध्ये तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्यामध्ये या बिग बॉसच्या घरात प्रेम संबंध झाल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर अजय देवगन हा प्रचंड नाराज झाला होता. तनीषाने अरमानसोबत प्रेम संबंध ठेवू नये, असे त्याचे म्हणणे होते. असाच प्रकार मराठी “बिग बॉस” मध्ये देखील अनेकदा पाहायला मिळतो. गेल्या बिग बॉस मध्ये रेशम टिपणीस सहभागी झाली होती. रेशम टिपणीस यांचे देखील एकाशी प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर तिच्या संसाराला नजर लागली आणि तिने संजीव सेठ यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.

गेल्या महिनाभरापासून बिग बॉसच्या शोचे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. महेश मांजरेकर हे या प्रोमो मध्ये सगळीकडे दिसत आहेत. महेश मांजरेकर गेल्या वर्षी आजारी पडले होते. त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. मात्र, त्यांनी यातूनही मात केली. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. मात्र, असे असले तरी त्यांची प्रकृती अतिशय बारीक झाली आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येत आहे.

आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रेम प्रसंग घडताना दिसत आहेत. बिग बॉसचे घर म्हटले की कुणा ना कुणाचे तरी एकमेकांसोबत प्रेम संबंध सुरू असल्याचे दिसत असते, तर आता बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये सहभागी झालेला प्रसाद जवादे आणि समृद्धी जाधव यांच्यामध्ये फ्लर्टिंग सुरू असल्याचे सध्यातरी आपल्याला दिसत आहे. समृद्धी जाधव हिने प्रसाद याला नॉमिनेशन केल्याचे आपण पाहिले आहे.

त्यानंतर या दोघांमध्ये अतिशय जोरदारपणे फ्लर्टिंग सुरू आहे, हे दोघेही एकमेकांना लाडिकपणे बोलत आहेत. समृद्धी जाधव ही प्रसाद याला म्हणताना दिसत आहे की, बाबू ने खाना खाया क्या आणि तो देखील तिला त्याच पद्धतीने उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये येणाऱ्या काळात आपल्याला प्रेम संबंध पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Team Hou De Viral