‘बोट खाली करून बोलायचं’, ‘तू काय माझी आई…’, ‘Bigg Boss Marathi 4’ च्या पहिल्याच दिवशी मोठा राडा

‘बोट खाली करून बोलायचं’, ‘तू काय माझी आई…’, ‘Bigg Boss Marathi 4’ च्या पहिल्याच दिवशी मोठा राडा

कलर्स मराठीवर मराठी बिग बॉस 3 मध्ये विशाल निकम हा विजेता ठरला होता. अनेक स्पर्धांमधून त्याने बाजी मारली आहे. विकास पाटील, जय दुधाने आणि विशाल निकम हे तिघे जण या स्पर्धेच्या अंतिम चरणात गेले होते. त्यानंतर विशाल निकम याने बिग बॉसचा किताब जिंकला होता.

आता बिग बॉसचे चौथे सत्र देखील सुरू झाले असून या चौथ्या सत्राचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर हेच करत आहेत. आता चौथ्या सत्रामध्ये जोरदार भांडण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदी बिग बॉसच्या धर्तीवर मराठी बिग बॉस सुरू करण्यात आला होता. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या रियालिटी शोच्या धर्तीवरच हिंदी बिग बॉसची सुरुवात करण्यात आली होती. सगळ्यात आधी या शोचं सूत्रसंचालन सलमान खान हा करायचा. तेव्हापासून आत्तापर्यंत सलमान खान हाच या शोचे सूत्रसंचालन करत असतो. आता बिग बॉस चे सूत्रसंचालन देखील तोच करत असतो.

अनेक स्पर्धक आपल्या कर्तबगारीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहेत. या शोमध्ये वेगवेगळे टास्क देखील देण्यात येतात. हिंदी बिग बॉसचा टीआरपी हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक हे चर्चेत आलेले आहेत. सध्या मराठी बिग बॉसचे चौथे सत्र सुरू झाले असून या सत्रामध्ये आपल्याला अनेक कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्याला प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राज शिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे याच्यासह इतर कलाकार सहभागी झाल्याचे दिसत आहेत. अपूर्वा नेमळेकर ही अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने या आधी देखील अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. रात्रीस खेळ चाले आहे ही तिची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये देखील अपूर्वा आपल्या बेधडक स्वभावाने सगळ्यांचे मन जिंकत आहे. मात्र, असे असताना तिचे पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे याच्याशी जोरदार भांडण झाले होते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अपूर्वा नेमळेकर ही प्रसाद याला म्हणताना दिसत आहे की, माझ्यासोबत बोलताना हात खाली करून बोलायचं. जास्त आरोगंस दाखवायचा नाही. मला बिग बॉसने जे सांगितलं आहे, ते मी करणारच. तू मला कोण सांगणार. माझ्याशी नीट वागायचं, नाही तर मी तुला दाखवून देईल, असे ती म्हणताना दिसत आहे.

तर दुसरीकडे प्रसाद देखील तिला बोलताना दिसत आहे आणि सगळे स्पर्धक बाकीचे ऐकताना दिसत आहेत, तर कलर्स मराठी वरील बिग बॉसचे चौथे सत्र आपण पाहतात का याबद्दल आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral