‘बिगबॉस मराठी ४’ मधल्या अपूर्वा नेमळेकर ची खरी जीवन कहाणी

‘बिगबॉस मराठी ४’ मधल्या अपूर्वा नेमळेकर ची खरी जीवन कहाणी

कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा शो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या शो मध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत. यामध्ये आपल्याला अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे, समृद्धी जाधव, निखिल राज शिर्के, विकास सावंत, किरण माने यांच्यासह इतर कलाकारही सहभागी झाल्याचे पाह्यला मिळत आहे. या शो मध्ये सध्या अपूर्वा नेमळेकर ही खूपच चर्चेत आली आहे.

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अण्णा नाईक ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी साकारलेली होती. माधव अभ्यंकर यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. आम्ही आज आपल्याला या मालिकेतील शेवंता बद्दल माहिती देणार आहोत.

शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली आहे. तिने ‘आभास हा’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा जन्म 27 डिसेंबर 1988 दादर येथे झा ला आहे. दादर येथे तिने रुपारेल कॉलेज येथून बी ए एम एस मध्ये पदवी मिळवलेली आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

त्यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटातून देखील काम केलेले आहे. तिला व्यावसायिक रंगभूमीवर देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवर तिने भूमिका केलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अपूर्वा हिने युवा सेने चा पदाधिकारी रोहन देशपांडे यांच्यासोबत लगीन गाठ बांधली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे वेगळे राहत असल्याची देखील चर्चा आहे.

मात्र, याबाबत अजूनही काही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे अपूर्वा सध्या कुणा सोबत राहते, याचे उत्तर तीच देऊ शकते. मात्र असे असले तरी सध्या तिचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येते. अपूर्वा सध्या आपल्या आई आणि भावासोबत राहत असल्याचे सांगण्यात येते. अपूर्वा हिच्या भावाचे नाव ओमकार असे आहे, असेही सांगण्यात येते.

Team Hou De Viral