‘बिगबॉस मराठी’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कुटुंबीयांना बद्दल जाणून घ्या

कलर्स मराठी या वाहिनीवर दोन ऑक्टोबर पासून बिग बॉस 4 सुरू झाले आहे. या बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत. अनेक कलाकार आपापल्या परीने चांगला खेळ देखील करताना दिसत आहेत. आता हे कलाकार योग्यरीत्या खेळून आपला खेळ चांगला जमवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारापैकी कोण बिग बॉसचा किताब जिंकतो हे पाहणे देखील फार मजेशीर ठरणार आहे. सहभागी झालेल्या कलाकारांचे खरे कुटुंबीय काय करतात कसे दिसतात आणि कुठे राहतात त्याबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच इच्छा असते. चला तर मग जाणून घेऊया या लेखांमध्ये..
तेजस्विनी लोणारे -तेजस्विनी लोणारे हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. आता बिग बॉसच्या घरात ती चांगले खेळताना दिसत आहे. तिच्या आईचे नाव नीलिमा लोणारे असे आहे.
प्रसाद जवादे – बिग बॉसच्या घरात प्रसाद जवादे हा देखील सहभागी झाला आहे. त्याचे आई वडील अतिशय मोकळे असून प्रसाद जवादे याचे त्यांच्याशी चांगले जमते. आपले अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
अमृता धोंगडे – अमृता धोंडगे हिने बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला आहे. अमृता हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. अमृता आणि तिचे कुटुंबीय खूपच चांगले आहेत. तिच्या कुटुंबीयाशी तिचे चांगले जमते.
किरण माने – बिग बॉसच्या घरात किरण माने हे देखील सहभागी झाले आहेत. किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेतून चर्चेत आले होते. आता ते देखील या शोमध्ये चांगले खेळताना दिसत आहेत. किरण माने हे आपल्या मुली सोबत आणि बहिणीसोबतचे फोटो कायमस सोशल मीडियावर शेअर करत असतात.
समृद्धी जाधव – समृद्धी जाधव हिने देखील पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये चांगला खेळ दाखवला आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना दिसत आहे. समृद्धीचे तिच्या वडिलांशी चांगल्या प्रकारे जमते.
अक्षय केळकर – अक्षय केळकर याचे बिग बॉसच्या घरात सगळ्यांसोबत चांगले नाते आहे. अक्षय केळकर याचे रियल लाईफ आई-वडील आणि बहीण श्रद्धा केळकर. श्रद्धा देखील या क्षेत्रात कार्यरत आहे.
अपूर्वा नेमळेकर – बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाल्यापासून अपूर्वा नेमळेकर हिचा अनेकांची वाद झाला आहे. असे असले तरी अपूर्वा आपल्या कुटुंबियाप्रती खूप संवेदनशील आहे. आपल्या आई-वडिलांसोबत त्यांनी फोटो शेअर करत असते.
योगेश जाधव – बिग बॉसच्या घरामध्ये योगेश जाधव हा देखील आता चांगल्या प्रकारे खेळ दाखवताना आपल्याला दिसत आहे. योगेश जाधव याचे त्याच्या आई सोबत चांगल्या प्रकारे नाते आहे.
अमृता देशमुख – अमृता देशमुख ही देखील चांगल्या प्रकारचा खेळ या शोमध्ये दाखवत आहे. अमृता देशमुख हिचे कुटुंबीय देखील खूप चांगले आहेत. अमृता देशमुखच्या भावाचे नाव अभिषेक देशमुख असून तो देखील अभिनेता आहे.
विकास सावंत – विकास सावंत याचे देखील बिग बॉस मध्ये सगळ्यांशी चांगले. जमते विकास सावंत सध्या अविवाहित असून त्याच्या कुटुंबास सोबत आनंदी आहे.
मेघा घाडगे – मेघा घाडगे हिचे तिच्या कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे जमते. सोशल मीडियावर ती आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. मेघा घाडगे हिचा भाऊ आणि कुटुंबीय.
त्रिशूल मराठे – त्रिशूल हा देखील बिग बॉस घरात चांगल्या प्रकारे खेळ करताना दिसत आहे. त्याची आई अनुपमा मराठे व बहीण.
डॉक्टर रवी शिंदे, रुचिरा जाधव – बिग बॉसच्या घरामध्ये ही जोडी देखील सहभागी झाली आहे. या जोडीचे एकमेकाशी चांगल्या प्रकारे बाऊडिंग आहे. हे दोघे रियल लाईफ मध्ये कपल असल्याचे सांगण्यात येते.