विणा जगताप ला सोडून आता ‘या’ अभिनेत्री सोबत ‘खटका’ जमलाय शिव ठाकरे चा, तिच्यासोबत रोमान्स…

कलर्स मराठी वर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा शो चर्चेत असतानाच आता हिंदीवर सुरू असलेला बिग बॉस देखील चर्चेत आला आहे. कारण या शोमध्ये मराठमोळा अभिनेता मॉडेल शिव ठाकरे हा सहभागी झाला आहे.
शिव ठाकरे याचे मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक असताना विना जगताप या अभिनेत्री सोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात रंगली होती. आता देखील हिंदी बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यानंतर शिव ठाकरे याचे एका स्पर्धक अभिनेत्री सोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा आहे.
काही महिन्यापूर्वीच शिव ठाकरे याचा एक व्हिडिओ समोर आला होता. शिव बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरासोबत झळकला होता. या दोघांना एकत्र पाहून मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. या दोघांचाही खास रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. मलायका तिच्या चाहत्यासाठी खास फोटो शेअर करत असते.
शिव हा द मॅन या टीव्ही रिॲलिटी शोमधून पुढे आलेला आहे. शिव ठाकरेसोबत मलायका ही थिरकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवने मलायकासोबत स्पेशल रिव शेअर केला होती. ही रूल चाहत्यांना भरपूर आवडली होती. आता या दोघांनी एक रोमँटिक रिल केली आहे. शिव ठाकरेने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मलायकाबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मराठी सिनेसृष्टीत मलायका पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदीमध्ये बिग बॉस हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. हिंदी बिग बॉसचे आता सध्या सोळावे सत्र सुरू आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाली आहेत.
यामध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा देखील सहभाग घेतला. शिव ठाकरे हा अभिनेत्या सोबत एक मॉडेल देखील आहे. अनेक जाहिराती आणि चित्रपटातही तो आपल्याला दिसलेला आहे. शिव ठाकरे याने याआधी आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली होती. आता शिव ठाकरे चर्चेत देण्याचे कारण म्हणजे बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याचे एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले आहे.
ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मध्ये सहभागी झालेली त्याची स्पर्धक आहे या अभिनेत्रीचे नाव सुंबल तक्वीर असे आहे. सुंबल आणि शिव यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र, आता हे दोघे याबाबत कधी खुलासा करतात, हे देखील पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. या आधी देखील विना जगताप आणि शिव यांनी आमच्यामध्ये प्रेम प्रकरण असल्याचे सांगितले होते.
Just Feel This Music With #ShivThakare And #SumbulTouqeerKhan ❤️ #BiggBoss16 pic.twitter.com/3Agv0Oam0a
— Billy 🖤 (@iamrealbilly) October 18, 2022
मात्र, नंतर बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी याचा विचार केला होता. त्यामुळे शिव आणि सुंबल यांच्यात नेमके नाते काय आहे हे लवकरच आपल्याला कळेल.