संध्याकाळ झाली की भीतीने ताप यायचा… स्नेहाने सांगितला अविष्कारसोबतच्या लग्नाचा वाईट अनुभव

संध्याकाळ झाली की भीतीने ताप यायचा… स्नेहाने सांगितला अविष्कारसोबतच्या लग्नाचा वाईट अनुभव

मराठी बिग बॉस सुरू होऊन आता जवळपास वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. या शोमध्ये वेगवेगळे टास्क स्पर्धकांना देण्यात येत आहेत. सगळे स्पर्धक आता स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणीतरी एकच जण यातील विजेता होणार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.

तरीदेखील असा भांडणे कमी होण्याचे नाव दिसत नाही. मीरा जगन्नाथ हिने आजवर सगळ्यांशी अनेकदा भांडणे केले आहेत. याचबरोबर इतर स्पर्धकांचे देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या शोमधून शिवलीला बाळासाहेब पाटील ही आता बाहेर पडल्यात जमा आहे, असे सांगण्यात येते.

तर स्पर्धकांपैकी कोण शोमध्ये तग धरून राहतो, हे आपल्याला पाहावं लागेल. आज आम्ही आपल्याला अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ यांच्यातील वादाबाबत माहिती देणार आहोत. गेल्या भागांमध्ये स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची या एका झोपाळ्यावर बसलेल्या दिसत आहेत. स्नेहा ही आविष्कार बद्दल तिच्याकडे तक्रार करत आहे.

या वेळेस सेन्हा वाघ सुरेखा कुडची यांना आविष्कार याने मला कसा त्रास दिला होता, ते सांगत आहे. त्या वेळेस मी केवळ सतरा वर्षाची होते आणि मला तो खूप छ्ळायचा. स्नेहा आणि सुरेखा झोपाळ्यावर बसल्या होत्या. त्यावेळी सुरेखा यांनी आविष्कार बद्दल विषय काढला. या वेळी अविष्कार याने तिला टी शर्ट भेट दिला.

मात्र, त्याने हे टीशर्ट देताना सुरेखा यांना सांगितले की, हा टी-शर्ट मी दिला आहे, असे सांगू नका. सर्वांच्या वतीने हा टी-शर्ट आम्ही तुम्हाला देत आहोत, असे सांगतो. मात्र, सुरेखा कुडची यांनी हा टी शर्ट अविष्कारने तुला दिला आहे, असे सांगितले. त्यावर स्नेहा ही भडकली आणि त्याच्याबाबत घटस्फोटापर्यंत झालेल्या घटना सर्व सांगू लागली.

पुढे स्नेहा म्हणाली, एक गोष्ट मला इथे शेअर करावीशी वाटते. खरं सांगायचं तर त्या व्यक्तीने मला खूप त्रास दिला. मी पळून आली. त्यातून एवढा त्रास म्हणजे संध्याकाळ झाली ना मला रडायला यायचं. मला रात्री ताप यायचा. आज रात्री मला काय करावं, तेच समजत नव्हते. माझ्यासोबत जे घडायचं हे सगळ्यांना माहीत होतं.

मी सेटवर जायचे, तेव्हा प्रत्येक वेळी इतर कलाकारांना ऍडजस्ट करायला लागायचं. एवढं सगळं केल्यावर तो माणुस सॉरी देखील म्हणायचा नाही. तो खरंच त्रासदायक आहे. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, काल तर तो मला बोलला तुझ्या बद्दल. स्नेहा म्हणाली, मी पळून आल्यावर मला कसा त्रास दिला गेला होता. तोही एक वेगळा त्रास आहे.

एवढा त्रास दिल्यानंतर आज मी त्या व्यक्तीबरोबर एकाच छताखाली आहे. मी काय करत आहे, माझं मलाच माहिती नाही. पण मी जेव्हा मी पहिल्यांदा त्याला बघितल तेव्हा काहीच सुचले नाही. ताई म्हणाल्या, मला तेच दर्शवायच होत की पहिल्यासारखं काही होऊ शकत नाही. यावर उत्तर देताना स्नेहा म्हणाली.

नाही ते काय म्हणतात ते आता कनमात्र नाही. दुसरीकडे सुरेखाताई सारखीच स्नेहा हिला बोलते हे आविष्काराला खटकत होतं. दुसरीकडे अविष्कार उत्कर्ष याला म्हणाला माझ्या डोक्यात गेले आहे. पहिल्यांदा चिडचिड होते माझी. आता उत्तर देऊ की नाही हे समजत नाही. मी जे शब्द वापरणार आहे, ते पण सांगू नाही शकत.

यावर उत्कर्ष, दादुस म्हणतात, तुझे उत्तर दे असे सांगतात. आविष्कार म्हणाला, ठीक आहे. ती सिनिअर आहे. मोठी आहे. आमच्यापेक्षा जास्त काम केले तिने आहे. शेवटी एकत्र काम करायचे आहे. एक दिवस हे संपेल सगळं. त्यावर उत्कर्ष देखील म्हणाला की घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळं काही विसरून जायचं. हा खेळ येथेच संपणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये अजून मजेशीर प्रसंग घडणार आहे.

Team Hou De Viral