‘बिगबॉस मराठी 4’ मधला हा स्पर्धक खऱ्या आयुष्यात आहे डॉक्टर, चालवतो स्वत:चा दवाखाना

‘बिगबॉस मराठी 4’ मधला हा स्पर्धक खऱ्या आयुष्यात आहे डॉक्टर, चालवतो स्वत:चा दवाखाना

Bigg Boss Marathi : कलर्स मराठी या वाहिनीवर मराठी बिग बॉसचे चौथ सत्र नुकतेच सुरू झाले आहे. 2 ऑक्टोबर रोजी हा शो सुरु झाला आहे. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.

यामध्ये तेजस्विनी लोणारे, समृद्धी जाधव, रुचिरा जाधव, रोहित शिंदे, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे निखिल राज शिर्के यांच्यासह इतर कलाकार देखील या शोमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे यशश्री मसुरेकर ही देखील या शोमध्ये सहभागी झाले आहे.यशश्री ही प्रसिद्ध रेडिओ जॉकी आहे.

त्याचप्रमाणे ती आपल्या व्हिडिओची शूटिंग करत असताना एक ऑटो घेऊन सोबत जात असते. त्यामुळे तिला टुकटुक राणी असे देखील संबोधण्यात येते. यशश्री ही बिग बॉस मध्ये सहभागी झाली त्यावेळेस अतिशय बोल्ड अवतारामध्ये सहभागी झाली होती. आपले अनेक फोटो तिने शेअर केले होते. एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पूल मध्ये बिकनी मध्ये पोहताना दिसली होती. त्यानंतर अनेकांनी तिच्या व्हिडिओला लाईक केले होते.अमृता देशमुख ही देखील या शोमध्ये उत्साहाने सहभागी झाले आहे. काही दिवसापूर्वी अमृता देशमुखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती बाथरूम मध्ये असताना पॅन्ट घालताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

त्यानंतर अमृता देशमुख हिने बिग बॉसकडे विनंती केली आणि हा व्हिडिओ कोणालाही दाखवू नका, असे सांगितले आहे. मात्र, त्यानंतरही हा व्हिडिओ काही ठिकाणी व्हायरल झाल्याचे आपण पाहिले. अमृता देशमुख ही अभिनेता अभिषेक देशमुख याची बहीण आहे. अभिषेक देशमुख सध्या आपल्याला आई कुठे काय करते, या मालिकेत यशच्या भूमिकेत दिसत आहे.

तर या शोमध्ये किरण माने देखील सहभागी झाले आहेत. किरण माने हे अलीकडच्या काळात मुलगी झाली हो या मालिकेमुळे चर्चेत झाले होते. या मालिकेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मालिकेचा निर्मात्यावर खूप टीका केली होती. आता बिग बॉस मध्ये सहभाग झालेला रोहित शिंदे हा खूपच चर्चेत आला आहे.

रोहित शिंदे हा खऱ्या आयुष्यामध्ये डॉक्टर आहे. त्याचप्रमाणे तो मॉडल देखील आहे. केवळ आवड म्हणून तो बिग बॉस मध्ये सहभागी झाला आहे. मात्र, त्याची समाजसेवा देखील सुरू असते. आपल्या वैद्यकीय पेशाचा तो फायदा करून घेत असतो, तर बिग बॉस मधील कुठला स्पर्धक आपल्या सर्वात जास्त आवडतो आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral