‘बिगबॉस मराठी ४’ मधील कलाकारांचे खरे नाव व वय, एक स्पर्धक तर आहे ५१ वर्षाचा…

दोन ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर बिग बॉसचे चौथे सत्र सुरू झाले आहे. चौथ्या सत्रामध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत. मात्र, हाय प्रोफाईल सेलिब्रिटी या चौथ्या सत्रामध्ये कोणीही दिसत नाही. एकच कलाकार या चौथ्या सत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. ते म्हणजे किरण माने.
किरण माने या शोमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे इतर कलाकार यांना जेमतेम प्रसिद्धी आजवर मिळालेली आहे. या कलाकारांनी काही मालिका चित्रपट आणि जाहिरातीमध्ये काम केल्याचे आपण पाहिले असेल, तर आज आम्ही आपल्याला बिग बॉस 4 मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे खरे वय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया..
प्रसाद जवादे – प्रसाद जवादे बिग बॉसच्या चौथ्या 17 मध्ये सहभागी झाला आहे. प्रसाद जवादे हा खूपच तरुण असून त्याचे वय हे 33 वर्षे आहे. अमृता धोंगडे – अमृता धोंडगे हिने काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. अमृता देखील बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाली आहे. अमृता हिचे वय 24 वर्ष आहे.
निखिल राजशिर्के -बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये निखिल हे देखील सहभागी झाला आहे. निखिल याचे वय हे केवळ 35 वर्ष आहे. किरण माने – किरण माने हे अतिशय वादग्रस्त राहिलेले अभिनेते आहेत. मुलगी झाली हो या मालिकेमध्ये त्यांचा प्रचंड वाद झाला होता. किरण माने यांचे वय 51 वर्ष आहे.
समृद्धी जाधव – समृद्धी जाधव ही देखील बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये सहभागी झाली आहे. समृद्धी जाधव हिने काही मालिका काही चित्रपटात काम केल्याचे सांगण्यात येते. समृद्धी जाधव हिचे वय केवळ 23 वर्ष आहे. अक्षय केळकर – अक्षय केळकर हा देखील काही मालिका आणि चित्रपटात आपल्याला दिसला आहे. अक्षय केळकर याचे वय केवळ 28 वर्षे असून तो अगदीच तरुण आहे.
अपूर्वा नेमळेकर – रात्रीस खेळ चाले या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा नेमळेकर हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. अपूर्वा नेमळेकर 34 वर्ष आहे. योगेश जाधव – योगेश जाधव याने देखील अनेक मालिका चित्रपट आणि नाटकात देखील काम केले आहे. योगेश जाधव हा देखील खूपच तरुण तुर्क आहे. त्याचे वय केवळ 32 वर्षे आहे.
अमृता देशमुख – अमृता देशमुख ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी ती नेहमी संवाद साधताना दिसत असते. अमृता हिचे 25 वर्षे आहे. यशश्री मसुरेकर – यशश्री मसुरेकर हिने अनेक मालिका आणि काही चित्रपटातही काम केले आहे. यशश्री हिचे वय 35 वर्ष आहे.
विकास सावंत – विकास सावंत आपल्याला अनेक अनेक विनोदी शोमध्ये दिसलेला आहे. विकास सावंत याच्याकडे काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. विकास सावंत याचे वय 22 वर्ष आहे. मेघा घाडगे – मेघा घाडगे ही देखील बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाली आहे. ती एक चांगली नृत्यांगण आहे. मेघा घाडगे हिचे वय 42 वर्ष आहे. मात्र तरी देखील ती खूप तरुण दिसते.
त्रिशूल मराठे– त्रिशूल मराठे हा देखील अतिशय लोकप्रिय असा कलाकार आहे. त्याने अनेक टीव्ही शो मालिकात आणि चित्रपटातही काम केल्याचे सांगण्यात येते. त्याचे वय केवळ 26 वर्ष आहे. रुचिरा जाधव – रुचिरा जाधव हीने देखील काही मालिका चित्रपटात काम केले आहेत. ती देखील आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचे वय केवळ 33 वर्ष आहे.
रोहित शिंदे – रोहित शिंदे हा बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन असल्याचे बोलले जाते रोहित शिंदे यांचे वय केवळ 29 वर्ष आहे.