काळ्या मनुक्यांसोबत दूध पिण्याचे फायदे, केसासह त्वचेला मिळतील हे लाभ

सुकामेवा न आवडणाऱ्या व्यक्ती आपल्याला फारच क्वचित आढळतील. पौष्टिक आहार म्हणून आईपासून ते आजीपर्यंत सर्वच जण सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. सुक्यामेव्यात असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंटमुळे हृदयविकार, कर्करोग यांसारख्या अनेक रोगांना दूर ठेवण्यास मदत होते. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनी योग्य प्रमाणात सुकामेव्याचे सेवन केल्यास मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले राहण्यास मदत मिळते.
सुकामेव्यातील मनुक्यांचे सेवन करण्याचे कित्येक फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकले असतीलच. पण विशेषतः काळ्या मनुक्याचा आहारात समावेश केल्यास तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होतील. मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. यातील पोषकघटकांमुळे रक्ताच्या समस्या कमी होतात. तसंच शरीराला अधिकाधिक फायबर मिळते. ज्यामुळे प्रक्रिया सुरळीत होते. जाणून घेऊया दुधातून काळे मनुके खाल्ल्यानं शरीराला होणारे फायदे.
त्वचेसाठी फायदेशीर –
काळ्या मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरिअलचे गुणधर्म आहेत. हे घटक आपलं कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात. अँटी-ऑक्सिडेंटमुळे त्वचा उजळण्यास मदत मिळते. तसंच अँटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे आपल्या त्वचेला सुरक्षा कवच मिळते. ज्यामुळे कित्येक प्रकारचे त्वचा संसर्ग होण्यापासून रोखले जातात. दुधातून मनुक्यांचे सेवन केल्यास शरीरातील दुर्गंध मलाद्वारे बाहेर फेकली जाते. यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांची समस्या कमी होते. शिवाय त्वचेवर नैसर्गिक चमक देखील दिसू लागते.
रक्तदाब राहतो नियंत्रणात –
आजच्या धकाधकीच्या जीवनात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. उच्च रक्तदाबामुळे अन्य आजारांना आयते निमंत्रण मिळते. रक्तदाब वाढल्यास स्ट्रोकचा देखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास होऊ नये, यासाठी वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. आरोग्याला होणारे धोके टाळण्यासाठी आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोटॅशिअमचा पुरवठा होणे गरजेचं आहे. काळ्या मनुक्यांमध्ये पोटॅशिअमचे घटक आहेत. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये काळ्या मनुक्यांचा समावेश करावा.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते –
शरीराला पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा व्हावा, यासाठी सुकामेव्याचे सेवन करणे हा चांगला पर्याय आहे. सुक्यामेव्यातील काळ्या मनुक्यांमध्ये (Black Raisins Benefits in Marathi) भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक शरीरासाठी औषधी गुणधर्मांच्या स्वरुपात कार्य करतात. काळ्या मनुक्यातील पोषकघटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुरुवात होते. यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर आहे. जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्याचे कार्य करते.
केसगळती थांबते –
‘व्हिटॅमिन बी’च्या कमतरतेमुळे केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. केसगळती, कोंडा होणे, केस कोरडे होणे यामागील मुख्य कारण म्हणजे शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांचा योग्य प्रमाणात पुरवठा न होणे. काळ्या मनुक्यांमध्ये लोह आणि ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर आहे. केसांच्या प्रत्येक समस्येतून सुटका हवी असल्यास नियमित दुधातून काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. या उपायामुळे दूध तसंच मनुक्यातील पोषकतत्त्वांचा तुमच्या शरीराला पुरवठा होईल आणि केसगळती थांबेल.
हाडे होतात मजबूत –
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीतही मोठ्या प्रमाणात हाडांचे दुखणे वाढत असल्याचं दिसत आहे. हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर पोषक गुणधर्म आहेत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे शरीरातील हाडे ठिसूळ होणे. या आजारापासून बचाव करण्यासाठी काळ्या मनुक्यांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार, काळ्या मनुक्यांमध्ये मॅग्निशिअमचे प्रमाण भरपूर आहे. या घटकामुळे हाडे कमकुवत होण्याचा त्रास कमी करण्यास मदत मिळू शकते. तसंच दुधासोबत काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यानं आरोग्यास प्रचंड प्रमाणात सकारात्मक लाभ मिळतात.
कोलेस्ट्रॉलचे समतोल प्रमाण –
शरीरामध्ये कोलेस्ट्रोलची पातळी असमतोल झाल्यास हृदयविकारांचा त्रास होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देणे आवश्यक आहे. काळ्या मनुक्यांमधील औषधी गुणधर्मांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी घटण्यास मदत मिळते.एवढंच नाही तर रक्तामध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील कमी होते. यामुळे रक्तभिसरण संस्थेचं कार्य देखील सुधारते. अन्नाचे पचन देखील सहजरित्या होत असल्यानं वजन नियंत्रणात राहते.
रक्तवाढीसाठी उपयुक्त –
काळ्या मनुक्यांमध्ये रक्त वाढीसाठी उपयुक्त पोषक घटक आहेत. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती असते. काळ्या मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण प्रचंड आहे. तुम्हाला दुधातून मनुके खाणे पसंत नसल्यास, मूठभर मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या मनुक्यासह त्याचे पाणी देखील प्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.