शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करायच्या आहेत का ? तर करा हे घरगुती उपाय..

शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करायच्या आहेत का ? तर करा हे घरगुती उपाय..

गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नसा संबंधित आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. नसामध्ये ब्लॉक झाल्यावर अनेकांना स्ट्रोक किंवा हृदयविकार यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर व्हेरिकोज व्हेन्स आणि इतर तत्सम आजार देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. या आजारांना आपण काढण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. उपचार करत असतो. सर्जरी करत असतो.

मात्र, तरीदेखील आपल्याला पाहिजे तसा फरक पडत नाही. आपल्याला ही समस्या होऊ नये असे वाटत असेल तर आपण काही उपाय करून यावर मात करू शकता. म्हणजे सकस आहार घेणे, व्यायाम करणे तसेच योगा यावर रामबाण उपाय आहेत.आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये असेच काही उपाय सांगणार आहोत. ते उपाय करून आपण आपल्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या या मोकळ्या करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. कुठले उपाय आहेत ते.

1) व्यायाम : जर आपल्याला एकाच जागी बसून ड्यूटी आहे किंवा आपण घरातही हालचाल करत नसाल तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. बैठी जीवनपद्धती ही अतिशय घातक अशी असते. त्यामुळे आपण नियमितपणे किमान चार किलोमीटरपर्यंत फिरले पाहिजे. यामुळे आपल्या रक्‍तवाहिन्या मोकळ्या होत असतात आणि आपले रक्ताभिसरण चांगल होत असते. यामुळे आपल्याला नसा ब्लॉक होण्याचा कुठलाही धोका होत नाही. त्यामुळे नियमितपणे व्यायाम हा केलाच पाहिजे.

2) योगा : योगा देखील नसा मोकळ्या करण्यासाठी रामबाण उपाय आहे. आपण वेगवेगळे योगासने करून आपल्या नसा मोकळ्या करू शकता. अगदी प्राणायाम, ओंकार करून देखील नसा या मोकळा होऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे योगा आपण हा केलाच पाहिजे. योगा केल्याने आपल्या रक्‍तवाहिन्या मोकळ्या होतात.

3) बदाम खावे : जर आपल्याला ड्रायफूड खाण्याची सवय नसेल तर आपण तातडीने ड्रायफूड खाणे सुरु करावे. नियमितपणे बदामाचे सेवन केल्याने रक्‍तवाहिन्या मोकळ्या होत असतात. बदाममध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत. बदाम हे प्रकृतीने गरम असतात. त्यामुळे रक्त पातळ होण्यासाठी मदत होते आणि आपले ब्लॉकेजेस वगैरे होत नाहीत. त्यामुळे बदामाचे नियमितपणे सेवन करावे.

4) लसुन आणि दूध प्या : लसुन आणि दूध प्यावे, असे सांगितल्यास आपल्याला कसेतरीच वाटेल. मात्र, असे केल्याने आपल्या रक्‍तवाहिन्या मोकळ्या होत असतात. ही पद्धती थोडी अवघड आहे. मात्र, लसूण आणि दुधाचे एकत्रित सेवन जर आपण केले तर आपल्या रक्‍तवाहिन्या मोकळ्या होत असतात आणि आपल्याला ही समस्याही निर्माण होत नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral