Bollywood च्या या खलनायकांच्या मुली राहतात कॅमेरा पासून दूर, पण एकाची मुलगी आहे बॉलिवूडची फेमस अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी खलनायक बनून नाव कमावले आहे. हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा आणि शक्ती कपूर यांच्यासारख्या स्टार्सचा यात समावेश आहे. आज आपण या खलनायकाच्या मुलींबद्दल बोलू, ज्यांपैकी काही चित्रपटांपासून दूर राहिल्या तर काहींनी बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली.
शक्ती कपूर
सर्वप्रथम बोलायच झालं तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर, ज्याने बॉलिवूडमध्ये नकारात्मक पात्राची भूमिका साकारून वर्षानुवर्षे प्रशंसा मिळवली. आता त्यांची मुलगी श्रद्धा कपूर एक एक करून बॉलिवूडमध्ये हिट्स चित्रपट देत आहे.
प्रेम चोप्रा
खलनायकाच्या या यादीमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्राचाही समावेश आहे. आपल्या 50 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत सुमारे 350 चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रेम चोप्राला रितिका, पुनीता आणि प्रेमा या तीन मुली आहेत. सर्वात लहान मुलगी प्रेमाचे लग्न बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीशी झाले आहे. प्रेमा व्यतिरिक्त इतर दोन्ही मुली पूर्णपणे प्रसिद्धीपासून दूर आहेत
कुलभूषण खरबंदाने
बॉलिवूड चित्रपटांमध्ये बहुतेक वेळा वडिलांच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता कुलभूषण खरबंदाने बर्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शान मधील त्याचे ‘शाकाल’ वाल्या भूमिकेला कोण विसरेल? कुलभूषण यांची मुलगी श्रुती खरबंदा खूप सुंदर आहे पण ती चित्रपटांपासून दूर आहे. श्रुती कदाचित चित्रपटांमध्ये काम करणार नसेल पण ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे.
रंजित
प्रत्येक चित्रपटात मारहाण करणारा अभिनेता रंजित आपल्या काळात प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. रंजित अजूनही बऱ्याच चित्रपटात दिसतो. पण त्याची मुलगी दिव्यांका फॅशन डिझायनर असून तिचा चित्रपटात काम करण्याचा हेतू नाही.
डॅनी डेन्झोंगपा
जेव्हा बॉलवुडच्या सुपरहिट खलनायकाची चर्चा येते तेव्हा डॅनी डेन्झोंगपाचे नाव समाविष्ट नसणे हे कसे बरे होईल. डॅनीची मुलगी पेमा डेन्झोंगपा सौंदर्य दृष्टीने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. पेमा चित्रपटांपासून दूर आहे पण बर्याचदा वडील डॅनीसमवेत चित्रपट कार्यक्रमात दिसली.