‘या’ अभिनेत्रीने 87 वर्षांपूर्वीच दिला होता तब्बल 4 मिनिटांचा पहिला किसींग सीन, उडाली होती खळबळ

‘या’ अभिनेत्रीने 87 वर्षांपूर्वीच दिला होता तब्बल 4 मिनिटांचा पहिला किसींग सीन, उडाली होती खळबळ

बॉलिवूड आणि रोमान्सचा खूप मोठा संबंध आहे. आजकाल जरी रोमान्सची चर्चा खुलेआम होत असेल. पण एक वेळ असा होता की, चुंबन घेण्याऐवजी दोन फुले बर्‍याचदा पडद्यावर एकत्र जुळतांना दिसत असत. आज आपण ते बघितलं की आपल्याला मजेदार वाटत .. तर विचार करा त्या दिवसात किसिंग सीन देण्यास किती विचार केला जात असत.

त्याचवेळी एका अभिनेत्रीने असे आश्चर्यकारक काम केले होत्र की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. ही अभिनेत्री इतर कोणीही नव्हती तर देविका राणी होती, 1933 च्या काळातील ही एक महान आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री होती. आज देविका राणी यांचा वाढदिवस. होय, 1908 साली आजच्याच दिवशी म्हणजे 30 मार्चला देविका राणी यांचा जन्म झाला होता.

9 मार्च 1994 साली देविका राणींनी जगाचा निरोप घेतला. आणि म्हणून आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत. त्यावेळी फुलांचा एकत्रपणा आला की ते पाहून प्रेक्षकांना समजायचे की हा एक किसिंग सीन आहे. हळूहळू चित्रपटात बदल होऊ लागले आणि किसिंग सीन स्क्रीनवर दाखवले जाऊ लागले.

आज तुम्हाला ‘किस’ हा शब्द ऐकल्यावर इमरान हाश्मीची आठवण झाली असेल. पण इमरान हाश्मीच्या खूप आधी अशी अभिनेत्री आली होती जिने पहिल्यांदा पडद्यावर एक किसिंग सीन दिला होता. सन 1933 मध्ये आलेल्या ‘कर्मा’ चित्रपटात अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशू राय यांनी एक किसिंग सीन दिला होता.

हा किसिंग सीन चार मिनिटांचा होता. या दृश्याने त्यावेळी मीडियात जबरदस्त हेडलाइन्स बनवल्या होत्या, आश्चर्य वाटण्यामागचं कारण म्हणजे तो बॉलीवूडचा पहिला किसिंग सीन होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा किसिंग सीन कोणत्याही प्रेम देखाव्याचा भाग नव्हता, या दृश्यात नायक बेशुद्ध असतो आणि नायिका त्याला प्रेमाने किस करते.

या चित्रपटाचा नायक हिमांशू राय आणि नायिका देविका राणी यांच्यासाठी हे किसिंग दृश्य देणे सोपे होते, कारण ते दोघेही वास्तविक जीवनातले पती आणि पत्नी होते. तथापि, त्यावेळी पडद्यावर असा सीन देणे हा एक धाडसी निर्णय होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral