बॉलिवूड मधल्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याची प्रकृती गंभीर ? रुग्णालयात दाखल…

बॉलीवूडचा सध्याचा आघाडीचा कलाकार टायगर श्रॉफ याने देखील सलमान खान याच्या बाबतीमध्ये एक मोठे वक्तव्य केलेले आहे. हे वक्तव्य ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. टायगर श्रॉफ हा सध्या आघाडीचा अभिनेता आहे.
टायगर श्रॉफ याचे नाव सध्या दिशा पाटणी च्या सोबत जोडल्या जात आहे. दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ सध्या दोघं एकत्र फिरताना अनेक दिसत असतात. याच बरोबर टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे एका अपार्टमेंटमध्ये आजूबाजूला राहत असल्याचे देखील सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या यांनीदेखील या दोघांच्या बाजूला फ्लॅट घेतला आहे.
त्यामुळे या सर्वांमध्ये चांगले जमत असल्याचे सांगण्यात येते. अरबाज खान याच्या पिंच 2 या शोमध्ये टायगर श्रॉफ याने त्याच्या वर्जिनिटी बाबत सांगितले. टायगर श्रॉफ म्हणाला की, मी सलमान भाई यांच्याप्रमाणेच वर्जिन आहे. त्याचबरोबर अरबाज याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळेस अरबाज ने त्याला विचारले की, तुला लोक खूप ट्रोल करतात.
त्यावर तू काय म्हणशील, त्यावर टायगर श्रॉफ म्हणाला की, एखादा व्यक्ती प्रसिद्ध होत असेल तर त्याला ट्रोल करण्यात येते. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की आता तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. यावेळेस टायगर श्रॉफ याने खंत देखील बोलून दाखवली. माझा चित्रपट प्रदर्शित होणे पूर्वीदेखील मला खूप जण ट्रोल करत असतात. त्यामुळे मला कधीतरी वाईट वाटते.
मात्र, ही चांगली बाब आहे. दिशा पाटणी बाबतही अरबाजने त्याला प्रश्न विचारला. मात्र, यावर त्याने गोलगोल उत्तर दिले. या आधी देखील दिशा पाटणी सोबत असलेल्या अफेयर बाबत कधीही खुलासा केला नाही. मात्र, दोघे अनेकदा फिरताना दिसत असतात.
अभिनेता टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती आणि फोटो देखील शेअर करत असतो. टायगर श्रॉफ याने आता नुकताच एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी होत असल्याचे दिसत आहे.
त्याचा बीपी आणि इतर गोष्टीची तपासणी डॉक्टर करत आहेत. त्यामुळे त्याला नेमकं काय झाले याबाबत माहिती कळू शकली नाही. मात्र, टायगर याला कुठलातरी आजार झाल्या असण्याची शक्यता आहे. टायगर याने नुकताच हा व्हिडिओ टाकला आहे. मात्र, त्याने काही माहिती दिली नाही. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यात चिंता व्यक्त होत आहे.