प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात, व्हील चेअरवरून घरी, हाताला मार अन् पायाला फ्रॅक्चर

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात, व्हील चेअरवरून घरी, हाताला मार अन् पायाला फ्रॅक्चर

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज रोल मॉडेल म्हणून सर्वांसमोर आहे. शिल्पा शेट्टी ही वयाची ४० शी पार केलेली अभिनेत्री असली तरी ती आजहीती वीस वर्षाच्या तरुणीसारखी दिसते. याचे कारण म्हणजे शिल्पा शेट्टी योगामध्ये पारंगत आहेत.

योगा करण्यात शिल्पा शेट्टीचा हात कोणीच धरू शकत नाही. एकदा तर बाबा रामदेव यांच्यासोबत शिल्पा शेट्टीने योगा करून सर्वांना चकित केले होते. तिची शरीरयष्टी अतिशय काटक आहे आणि योगा करण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही. शिल्पा शेट्टी ने योगावर अनेक पुस्तके लिहिली असून सीडीचे प्रकाशन देखील केले आहे.

शिल्पा शेट्टी हीने बॉलिवूडमध्ये आग या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत गोविंदा हा दिसला होता. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती अब्बास-मस्तान यांच्या बाजीगर या चित्रपटाने. या चित्रपटात तिने काजोल आणि शाहरुख खान याच्यासोबत काम केले. ते सुरवातीचा काही वेळाचा रोल केल्यानंतर तिचा मृत्यू होतो, असे दाखवण्यात आले होते.

त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत अनेक चित्रपट केले. मै खिलाडी तु आनाडी हा चित्रपट प्रचंड गाजला. यातील चुराके दिल मेरा हे गाणेदेखील खूप गाजले होते. त्यानंतर सगळ्यात शेवटी शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमारसोबत धडकन या चित्रपटात काम केले. हा चित्रपट देखील खूप चालला होता.

शिल्पा शेट्टी सध्या पूर्ण वेळ आपल्या घराकडे लक्ष देते. शिल्पा शेट्टीचा विवाह राज कुंद्रा सोबत झालेला आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. शिल्पा शेट्टी सध्या छोट्या पडद्यावर अनेक टीव्ही शो मध्ये दिसत असते. शिल्पा शेट्टीचा अपघात झाला असून शिल्पाने तिच्या अपघाताचा फोटो शेअर केला आहे. शिल्पाचा अपघाताचा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

फोटोमध्ये ती हसताना जरी दिसत असली तरी तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे दिसत आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे व्हीलचेअर वर बसलेली आहे. या फोटोत शिल्पाचा डेनिम – ऑन – डेनिम लूक पाहायला मिळत आहे. शिल्पाने हसत हात वर करून फोटोसाठी पोज दिली असली तरी तिच्या हाताच्या तळव्याला बँडेज असल्याचे देखील दिसत आहे.

शिल्पाच्या चेहऱ्यावर फक्त हसूच नाही तर तिने तिच्या फोटोला कॅप्शन ही पॉझिटिव दिले आहे. रोल कॅमेरा ॲक्शन घेतला- ‘ब्रेक अ लेग! ‘असं म्हणत तिने अपघात झाल्याचे सांगितले आहे. शिल्पा चा अपघात झाला असला तरी तिने म्हटले आहे की मी सहा आठवडे शूटिंग करू शकत नाही.

पण मी लवकरच ठणठणीत बरी होऊन पुन्हा त्याच जोमाने काम करेल तोपर्यंत दुवाॅं ओ मे याॅंद रखना चाहत्यांनी केलेली प्रार्थना नेहमीच पाठीशी उभ्या राहतात असे तिने म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Team Hou De Viral