तो भयानक अपघात आणि बॉलिवूडच्या या ‘बोल्ड’ अभिनेत्रीचं करिअर संपलं

तो भयानक अपघात आणि बॉलिवूडच्या या ‘बोल्ड’ अभिनेत्रीचं करिअर संपलं

अभिनय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचा चेहरा ही त्यांची ओळख असते. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या चेहऱ्याची आणि त्यांच्या स्किनची चांगली काळजी घेतात आणि त्यासाठी खूप मेहनत घेतात. परंतु जर त्यांचा चेहरा बदलला तर? त्यांना कोणीही ओळखणार नाही. परंतु अशी एक घटना बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडली आहे.

जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मग विचार करा त्या अभिनेत्रीवर काय प्रसंग ओढावला असेल. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगित आहोत, तिचे नाव महिमा चौधरी आहे.महिमा चौधरी ही आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही खूप कौतुक झाले.

आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने महिमाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच प्रेक्षकांच्या मनात एक खास ओळख निर्माण केली होती. ती सध्या चित्रपट विश्वापासून दूर आहे, पण तरी त्याची लोकप्रियता कायम आहे. महिमा चौधरीने 1997 मध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

‘परदेस’ हा तिचा पहिला चित्रपट होता. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानसोबत अभिनेत्री महिमाने काम केलं आहे. या चित्रपटात अपूर्व अग्निहोत्री, अमरीश पुरी, आलोक नाथ यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. अभिनेत्री महिमाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला.

महिमा चौधरीने यानंतर आणखी चित्रपटांमध्ये काम केले. 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये जन्मलेली अभिनेत्री महिमा चौधरी आता 48 वर्षांची झाली आहे. अभिनेत्री महिमा चौधरी सुरुवातीला बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय होती, मात्र नंतर ती अचानक गायब झाली. खरं तर, परंतु असे का घडले याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

खरंतर तिच्यासोबत एक मोठा अपघात घडला, ज्यामध्ये त्याचा चेहरा खराब झाला. ज्यामुळे त्यांची फिल्मी करिअर संपलं.तिच्यासोबत घडलेला हा अपघात साधासुधा अपघात नव्हता कारण, यामुळे तिचं फिल्मी करिअर तर संपलंच शिवाय तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं.

एका मुलाखतीत महिमाने स्वत: या भीषण अपघाताबद्दल सांगितले. खरेतर अजय देवगण आणि काजोलच्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूमध्ये असताना हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले. तिथे एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली आणि तिच्या कारची विंडशील्ड फुटून तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली.

महिमा पुढे म्हणाली, “मला वाटत होते की मी मरत आहे. दवाखान्यात पोहोचल्यावर जेव्हा मी शुद्धीवरती आले तेव्हा मी अजय आणि माझ्या आईचे बोलणे ऐकले. त्यानंतर जेव्हा मी उठून आरशात माझा चेहरा पाहिला तेव्हा मला धक्का बसला. डॉक्टरांनी तेव्हा माझ्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून काचेचे 67 तुकडे काढले.

“अपघातानंतरच्या घडामोडीबद्दल बोलताना महिमा पुढे म्हणाली की, तिच्या टाक्यांमुळे आणि सर्जरीमुळे तिला घरातच राहावे लागले. ज्यामुळे तिला उन्हात बाहेर जाण्याची देखील परवानगी नव्हती. तसेच तिची संपूर्ण खोली पूर्णपणे काळ्या पडद्यांनी झाकली होती, जेणे करुन सुर्य प्रकाश तिच्या चेहऱ्यावरती पडू नये.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुर्याच्या UV किरणामुळे तिच्या चेहऱ्यावर डाग पडू शकतील, त्यामुळे चट्टे टाळण्यासाठी तिला यूव्ही किरणांपासून दूर राहावे लागले.महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. हे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री महिमा आणि बॉबी यांना आर्याना चौधरी नावाची मुलगी देखील आहे.

Seema