नादच केला ! लग्नाचा पहिलाच दिवस नवरीला पडला महागात; गाडीच्या बोनटवर बसून घेतली एन्ट्री आणि…., पहा विडिओ

नादच केला ! लग्नाचा पहिलाच दिवस नवरीला पडला महागात; गाडीच्या बोनटवर बसून घेतली एन्ट्री आणि…., पहा विडिओ

करोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी लग्नासाठी विविध पर्यायी मार्गांचा वापर केला आहे. त्यामुळे अनेक जोडप्यांनी बऱ्याच हटके पद्धतीने लग्न करत आपली हौस पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले आहे. जमिनीवर लॉकडाऊन असल्याने तमिळनाडूच्या मदुराई येथे विमानात लग्न पार पडले होते. त्यामुळे अशा काही उदाहरणांमुळे हे लग्न सोहळे कायम लक्षात राहत आहेत.

मात्र आता आपल्या लग्न सोहळ्यातही असाच काही हटके प्रकार व्हावा यासाठी बरीच जोडपी आग्रही असल्याचे दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील दिवे घाटात पहायला मिळाला. पुण्यातील दिवे घाटात एक वधू चक्क गाडीच्या बोनेटवर बसून आपल्या विवाह सोहळ्यासाठी जात असताचा व्हिडिओ समोर आला आहे. वेगळ काही करण्याच्या प्रयत्नात या नववधूला नियमांचा विसर पडला.

त्यामुळे आता लोकांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओमध्ये पुण्याच्या भोसरी परिसरात राहणारी एका नवरी मुलगी दिवे घाटात चक्क गाडीच्या बोनेटवर बसून लग्नासाठी जात असल्याचे दिसत आहे. लग्नासाठी जात असलेल्या नवरीने गाडीच्या बोनेटवर बसून थेट दिवे घाटातून मंगल कार्यालयात जाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास केला आहे.

सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, या उत्साही नवरी आणि तिच्या कुटुंबियांना चक्क कायद्याचा विसर पडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये नवरी मुलगी गाडीच्या बोनेटवर बसली असली असून त्याचा व्हिडिओ शूट केला जात आहे. गाडीमध्ये मुलीचे नातेवाईक देखील बसलेले आहेत.

Team Hou De Viral