शेतकऱ्याने गोठ्यात लावला सीसीटीव्ही कॅमेरा,गोठ्यात जे दिसले ते पाहून झाला हैराण

शेतकऱ्याने गोठ्यात लावला सीसीटीव्ही कॅमेरा,गोठ्यात जे दिसले ते पाहून झाला हैराण

चोरांच्या उपद्रवामुळे शेतातल्या डाळींब पिकाचे नुकसान झाले म्हणून एका शेतकऱ्यांने घराभोवती आणि डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आणि विशेष म्हणजे कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी सीसीटीव्हीत बिबट्याच पहायला मिळाल्याची घटना घडली आहे.

लौकी गावातील दरेकरवस्तीत राजेंद्र रामदास वाळूंज यांच्या गावठी गाईच्या गोठ्यात बिबट्याने रविवारी रात्री शिरकाव करून ह ल्ला करण्याचा प्रयत्न केला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.

दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गावठी गाई आणि एक वासरू असा एकूण सात जनावरांचा गोठा आहे. तसंच 35 एकर डाळिंबाची बागही घरासमोरच आहे. चोरांच्या उपद्रवामुळे गेल्या वर्षी त्यांचे डाळींब पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी त्यांनी घराभोवती व डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

विशेष म्हणजे कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी त्यांना सीसीटीव्हीत बिबट्याच पहायला मिळाला. बिबट्या व गाईचा थ रारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याने दहा कोंबड्या फ स्त केल्या आहेत. मात्र, गाईंनी आक्रमकता दाखवल्याने बिबट्याची भंबेरी उडाली आणि गोठ्यातील 5 गाई बाल बाल ब चाव ल्या.

या भागात बिबट्याचा नेहमीच वावर आहे. वाळूंज यांनी सदर घटना स्थानिक ग्रामस्थांद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली होती. वनरक्षक कैलास दाभाडे, कल्पना पांढरे, राजेंद्र गाढवे व कर्मचारी कोंडीभाऊ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

परिसरातील शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठ से आढळून आल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.त्यानुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रविवारी परिसरात पिंजरा लावला आहे. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवण्यात आली आहे.

इतर बातम्या

बॉलीवुड मधल्या नेपोटिज्मबाबत सुशांत सिंह राजपूतच्या परिवारने दिली प्रतिक्रिया, मेहुण्याने उचलला असा पाऊल

सुशांतच्या मृ त्यूच्या दोन आठवड्यानंतर अंकिता लोखंडेला सतत विचारले जातात आहेत हे पाच प्रश्न !

Team Hou De Viral