शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय कराच

शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय कराच

अंगावर चामखीळ असण्याची समस्या अनेक आजी आजोबांना असते. त्यांच्या त्वचेवर चामखीळ दिसते. शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरिरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही घरगुती उपायाने या चामखिळी घालवता येतात.

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींकर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात.

काहीवेळा तर चामखीळ कोणत्याही उपचाराविनाच गायब होतात. विषाणूंच्या संसर्गाला रोगप्रतिकारक्षमता निर्माण झाल्यामुळे असे घडत असावे. जुन्या उपचारानुसार चामखीळ काढून टाकण्यासाठी त्या जागी घोडय़ाचा केस बांधतात. काहीवेळा सुई तापवून चटका देतात. काहीवेळा लेसर किरणांचा मारा करतात किंवा चामखिळीच्या ऊती शुष्क बर्फाने गोठवितात.

काही केळेला शस्त्रक्रियेने चामखीळ काढून टाकतात. पण त्यावेळी तेथे वेदना होऊ नयेत म्हणून तेवढा भाग बधिर करतात. घरगुती उपचार पद्धतीत प्रामुख्याने रसायने लावतात. मात्र, अशा पद्धतींमुळे चामखीळ पूर्णपणे बरी होत नसल्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तेथे चामखीळ काढल्याचे आढळते.

अश्याप्रकारे करा नाहीशी

चामखिळीच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगार अधिक फायदेशीर असतं. रोज किमान तीनदा कापसाने चामखिळीवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर चामखिळीचा रंग बदलेल आणि तो सुकेल. याशिकाय अॅलोव्हेराचं जेलही लावू शकाल.

लिंबाचा रस चामखिळीच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस चामखिळीवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

बटाटय़ाचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये चामखिळीला नाहीसा करण्यासाठीचं एन्झाईम्स असतात.

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीकरही फायदेशीर आहे. बेकिंग सोडा एरंडाच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखीळवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये फरक दिसेल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral