‘चौकट राजा’ चित्रपटातील ही चिमुकली आठवतेय का? 29 वर्षांनंतर आता दिसते अशी

‘चौकट राजा’ चित्रपटातील ही चिमुकली आठवतेय का? 29 वर्षांनंतर आता दिसते अशी

1991 साली चौकट राजा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 29 वर्षे उलटली आहेत तरीदेखील आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. हा चित्रपट पाहताना बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आले असेल.

संजय सुरकर दिग्दर्शित आणि स्मिता तळवळकर निर्मित चौकट राजा चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला त्यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. चित्रपटात स्मिता तळवळकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा देशपांडे, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर बालकलाकार राजसी बेहरे हिने देखील आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली होती.

चौकट राजा या चित्रपटात स्मिता तळवळकर आणि दिलीप कुलकर्णी यांच्या मुलीची म्हणजेच राणीची भूमिका राजसी बेहरे हिने साकारली होती. एक बालकलाकार म्हणून राजसीला या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन 29 वर्षे उलटली आहेत आणि या चित्रपटातील बालकलाकार राजसी बेहरे आता कशी दिसत असेल, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

राजसी बेहरे बालकलाकार म्हणून लोकप्रिय झाली पण आता ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. मधल्या काळात ती अभिनय क्षेत्रात कार्यरत होती परंतु तिने इंडस्ट्रीतून काढता पाया घेतला.

शालेय शिक्षणात अत्यंत हुशार असलेल्या राजसीने पुढे मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विस्तार टेक्नॉलॉजीस मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली.

सध्या ती हंसा सेक्विटी (Hansa Cequity) या मार्केटिंग कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार या पदावर कार्यरत आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी राजसी बेहरे ही चैतन्य बिवलकर यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली. चैतन्य बिवलकर हे Mindshare fulcrum या कंपनीत कार्यरत आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral