‘चवळी’ खाण्याचे ‘हे’ 5 फायदे माहिती आहेत का ? ‘डायबिटीस’ देखील होईल दूर

‘चवळी’ खाण्याचे ‘हे’ 5 फायदे माहिती आहेत का ? ‘डायबिटीस’ देखील होईल दूर

आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा, असे डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात. प्रत्येक कडधान्याचे आपआपले वेगळे गुणधर्म आहेत. काही कडधान्य विविध आजारांवर खुप लाभदायक ठरतात. चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. एवढेच नव्हे, मधुमेहासारख्या आजारावर सुद्धा चवळी गुणकारी आहे. चवळी सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1)मधुमेह – चवळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शिअम अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते. भरपूर कॅल्शिअम असल्याने चवळी नियमित खावी.

2) पोट साफ होणे – चवळीतील सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पाचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, पोट व्यवस्थीत साफ होते. दिवसभर उत्साह वाटते.

3) लठ्ठपणा – वजन कमी करण्यासाठी चवळ उपयोगी आहे. यातील प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. त्यामुळे चरबी कमी होते.

4) गरोदर महिला – गरोदरपणात महिलांनी चवळी नियमित खावी. यामुळे कॅल्शिअमची झीज भरून निघते. बाळाची योग्य वाढ होते. प्रसूतीला त्रास होत नाही. प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येते.

5) हृदयरोग – चवळीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे हृदयरोग दूर राहतात. लोहाची कमतरता भरून निघते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral