पछाडलेला चित्रपटातला ‘बाबा लगीन…’ म्हणणारा बाब्या आठवतोय का?, खुपचं बदललाय तो ओळखणं झालंय कठीण

2004 साली ‘पछाडलेला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शित महेश कोठारे यांनी केले होते. या चित्रपटामध्ये आपल्याला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे दिसले होते. हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला होता. त्यानंतर त्यांच निधन झाले होते.
त्यानंतर एकच हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग म्हणजे “बाबा लगीन” हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा डायलॉग बाब्याचा डायलॉग आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल सात कोटीहून अधिक पैसे कमावले होते. त्यावेळेस बॉक्स ऑफिस वर मराठी चित्रपटाने केलेली ही सर्वाधिक कमाई होती, असे देखील बोलले जात होते.
इनामदारांच्या वाड्यात बाब्या “बाबा लगीन” म्हणत मनीषा सोबत लग्न करायला धडपडत असतो. मात्र भरत, रवी आणि समीर हे तिघे मित्र मनीषाला संकटातून कसे सुखरूप बाहेर काढतात, असे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बाबा लगीन हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याचे श्रेय जाते ते या पात्राला साकारणाऱ्या कलाकाराला म्हणजेच अमेय हुनसवाडकर याला.
अमेय याने हिंदी चित्रपटात तसेच मराठी चित्रपटात काम केले आहे. लहान मोठ्या भूमिका साकारत असताना “बाब्याच्या” भूमिकेने त्याच्या करिअरला एक मोठे वळण मिळाले आहे. विनोदाचे उत्तम टाइमिंग आणि अभिनयाची सांगड घालत त्याने हिंदी चित्रपटात देखील यश मिळवले आहे.
नायक, तुझे मेरी कसम,अजब प्रेम की गजब कहानी अशा बॉलीवूड चित्रपटातून त्याच्या अभिनयाला वाव मिळाला आहे. पछाडलेला चित्रपटानंतर खबरदार पत्र नवे शस्त्र या चित्रपटात तो पत्रकाराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटामध्ये भरत जाधव याची प्रमुख भूमिका होती. त्याचबरोबर या चित्रपटात आपल्याला संजय नार्वेकर हे दिसले होते.
अमेय गेल्या काही वर्षापासून जाहिरात क्षेत्रात नाव कमवत आहे. तसेच तो लवकरच एका बॉलीवूड चित्रपटातून महत्त्वाची भूमिका साकारताना आपणास दिसणार आहे. छत्री वाली या आगामी बॉलिवूड चित्रपटाचा तो रकुल प्रीत सिंग आणि सतीश कौशिक यांच्यासोबत दिसणार आहे. तेजस देवस्कर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

हा चित्रपटात एक कंडोम फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ पूर्ण झाले असून हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.