‘चामखीळ’ ची समस्या असल्यास हे घरगुती उपाय करावे काही वेळात निघुन जाईल चामखीळ..

आपल्या चेहऱ्यावर चामखीळ असेल तर माणसाचा चेहरा हा विद्रुप दिसायला लागतो. मात्र, ही चामखीळ काही लोकांना उठून दिसते. त्यामुळे असे लोक ही चामखीळ काढत नाहीत. मात्र, अनेकांना चामखीळ शरीराच्या इतर भागावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे असे लोक याने त्रस्त असतात.
जर शस्त्रक्रिया काढून आपण चामखीळ किंवा मस काढली तर ती नंतर परत यायला सुरुवात होते. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल, प्रदूषण यामुळे देखील चामखीळ सारखी येते. आपण काही घरगुती उपाय करून चामखीळ काढू शकतात. मात्र, हे उपाय सातत्याने करावे लागतात त्या नंतर आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.
1) सफरचंदाचा विनेगर : जर आपल्याला चेहऱ्यावर चामखीळ असेल तसेच इतर भागावर देखील चामखीळ मोठ्या प्रमाणात असतील तर आपण घरगुती उपाय करू शकता. बाजारामध्ये सफरचंदाचा विनेगर हा सहजरित्या उपलब्ध होतो. हा विनेगर आणून ज्या ठिकाणी चामखीळ आहे, त्या ठिकाणी लावावा. काही दिवस हा प्रयोग करावा. त्यानंतर आपली चामखीळ ही सुकते.
2) लिंबाचा रस : आपल्या शरीरावर चामखीळ मोठ्या प्रमाणात असल्यास आपण डॉक्टरकडे जाऊन उपाय करतो. मात्र, त्यामध्ये आपल्याला फरक येत नाही. अशा वेळेस आपण घरगुती उपाय करू शकता. घरात असणाऱ्या लिंबाचा रस चामखिळीवर काही दिवस लावा. काही दिवसानंतर चामखीळ ही नष्ट होते. जर पुन्हा चामखीळ आल्यास हाच प्रयोग करत राहावा.
3) बटाट्याचा रस : आपल्याला चेहर्यावर किंवा शरीराच्या इतर भागात चामखीळ समस्या असेल तर आपण घरगुती उपाय करू शकता. बटाटा कापून त्याचा रस तयार करावा आणि ज्या ठिकाणी चामखीळ आहे, त्या ठिकाणी ती लावावी. असा प्रयोग केल्याने आपली चामखिळ ही नष्ट होऊ शकते. हा प्रयोग सातत्याने करावा लागेल.
4) अननसाचा रस : बाजारामध्ये अननस हे सहजरीत्या उपलब्ध असतात. अननसामध्ये विशिष्ट रसायन असते. त्यामुळे ते इतर आजारावर देखील चांगल्या प्रकारे काम करते. चामखीळ समस्या असल्यास अननसाचा रस करून चामखिळीवर लावावा. हा प्रयोग तीन दिवस करावा. काही दिवसानंतर आपली चामखीळ नष्ट होते.
5) बेकिंग सोडा : बेकिंग सोडा हा बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध असतो. बेकिंग सोडा मध्ये खूप सारे गुणधर्म जडलेले असतात. आपल्याला चामखीळची समस्या असल्यास आपण बेकिंग सोडाची पेस्ट तयार करून चामखिळीवर लावावी, असे तीन दिवस करावे. त्यानंतर आपली चामखीळ सुकून जाते. काही दिवस हा प्रयोग करत राहावा.
6) लसून पेस्ट : आपल्या घरामध्ये लसूण हा उपलब्ध असतो. लसुन बहुगुणी आहे. लसणाचे उपयोग अनेक आहेत. लासूनामध्ये मोठे गुणधर्म आहेत. त्यामुळे लसूण हा अनेक आजारांवर काम करतो. चामखीळ समस्या असल्यास लसूण पेस्ट तयार करावी आणि ती ज्या ठिकाणी चामखीळ आहे, त्या ठिकाणी लावावी, असा प्रयोग किमान आठवडाभर करावा. काही कालावधीनंतर आपली चामखीळ ही निघून जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.