छातीत होणाऱ्या ‘जळजळ’ मागे आहेत ‘ही’ कारणं… आजच करा हा बदल

छातीत होणाऱ्या ‘जळजळ’ मागे आहेत ‘ही’ कारणं… आजच करा हा बदल

आजकाल लहान मुलांनादेखील ॲसिडिटीचा त्रास होतो, असे आपण ऐकले असेल. याचे कारण देखील बाहेरचे मोठ्या प्रमाणात पदार्थ खाणे होय. आज नोकरीनिमित्त अनेक तरुणांना बाहेर राहावे लागते. त्यामुळे वेळेवर जेवण होत नाही आणि बाहेरचे जेवण हे मसालेदार तिखट असते. त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आणि छातीमध्ये जळजळ व्हायला लागते. जर आपल्याला अन्न पचन झाले नाही आणि आपली शौच साफ झाली नाही तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. आपण काही असे घरगुती उपाय करून देखील ठरू शकतात.

1) समतोल आहार –

आपण आपल्या जेवणामध्ये असा समतोल असा आहार घ्यावा की ज्यामुळे छातीत जळजळ होणार नाही. म्हणजे वरण-भात-भाजी-पोळी यासोबत सलाड देखील खावे. यामुळे आपल्या छातीत जळजळ ही होणार नाही. एकूण जेवणाच्या ८० टक्के जेवण करावे. त्यामुळे आपण समतोल आहार घेऊ शकता आणि छातीत जळजळ होणार नाही. आपल्याला भूक लागल्यावर भरपूर आपण जेवतो. असे केल्याने अन्नपचन होत नाही आणि ॲसिडिटीची समस्या किंवा छातीत जळजळ व्हायला लागते. त्यामुळे समतोल आहार घ्यावा.

2) खाण्यावर लक्ष ठेवावे –

जर आपल्याला एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होत असेल तर असा कोणता पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जळजळ होते हे कायम लक्षात ठेवावे आणि असा पदार्थ आपण खाण्यास वर्ज्य करावा. जेणेकरून आपल्या छातीत जळजळ होणार नाही. अनेकदा आपल्याला लक्षात येत नाही की कुठला पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जळजळ होते. मात्र, आपण बारीक लक्ष ठेवून असा पदार्थ खाणे टाळावे. आपल्या छातीत जळजळ होणार नाही.

3) मद्यपान –

जर आपल्याला मद्यपानाची सवय असेल तर हे तातडीने थांबवावे. ज्या लोकांचे मद्यपान मोठ्या प्रमाणात असते त्यांची भूक ही मंदावते आणि ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि आपल्या छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे मद्यपान करणे थांबवावे आणि आपण छातीत जळजळ होणार नाही याची काळजी घ्यावी.

4) मसालेदार पदार्थ

जेवणामध्ये मसालेदार पदार्थांचे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी समस्या, छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सात्विक जेवण हे नेहमी करावे. ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणार नाही किंवा छातीत जळजळ होणार नाही. मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ नेहमीच आपल्या जेवणात टाळावेत.

5) तणाव

अनेकदा विनाकारण आपण कुठल्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने देखील आपल्या छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे आपल्याला पुढील आजाराचा धोका ओळखून असा तणाव घेणे टाळावे. तणाव देखील आजारच असल्याचे सांगण्यात येते. तणाव घेतल्याने आपल्या छातीत जळजळ ही समस्याही होऊ शकते, असे देखील डॉक्टर लोक सांगतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral