चिन्मय मांडलेकरच्या बायकोला पाहिलंय का ?, एखाद्या अभिनेत्रीला लावजेल इतकी सुंदर आहे

चिन्मय मांडलेकरच्या बायकोला पाहिलंय का ?, एखाद्या अभिनेत्रीला लावजेल इतकी सुंदर आहे

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले अस्तित्व गेल्या काही वर्षात सिद्ध केले आहे. आता तो हिंदीमध्ये देखील अनेक चित्रपटात आपल्याला दिसत असतो. विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.

अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे चित्रपट समीक्षकांनी सांगितले आहे. या चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकर याने देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चिन्मय याने या चित्रपटात दहशतवादी बिट्टाची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला विशेष गौरवण्यात आले आहे.

चिन्मय मांडलेकर याचा पावनखिंड हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून या चित्रपटालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका चिन्मय याने या चित्रपटात साकारली आहे चिन्मय मांडलेकर हा हरहुन्नरी कलाकार म्हणून सर्वपरिचित आहेत.

चिन्मय मांडलेकर नाट्यलेखक, संवाद लेखक आणि अभिनेता म्हणून देखील या क्षेत्रात वावरताना दिसत असतो. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. मॅक्स प्लेयर या ओटी प्लॅटफॉर्मवर गेल्या वर्षी एक थी बेगम ही वेबसिरीज रिलीज झाली होती. या वेब सिरीज मध्ये चिन्मय याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

त्याच्या या भूमिकेला देखील विशेष पद्धतीने गौरवण्यात आले होते. चिन्मय मांडलेकर याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तू तिथे मी त्याची ही मालिका मी प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये आपल्याला मृणाल दुसानीस ही दिसली होती. चिन्मय मांडलेकर याने अवधूत गुप्ते याच्या झेंडा या चित्रपटातही काम केले.

झेंडा हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली होते. या चित्रपटात त्याचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता गेले काही दिवसांपासून चिन्मय मांडलेकर याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चिन्मय मांडलेकर आणि ती एकत्र दिसत आहेत.

चिन्मय मांडलेकर याच्या पत्नीचे नाव नेहा जोशी असून ती देखील कला क्षेत्रातच कार्यरत आहे. नेहा जोशी ही वाईल्ड फोटोग्राफर असून तिने अनेक ठिकाणी आपल्या फोटोंचे प्रदर्शन देखील भरवले आहे. नेहा जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांची केमिस्ट्री ही खूप चांगल्या प्रकारे जमत असल्याचे सांगण्यात येते.

तर आपल्याला चिन्मय मांडलेकर आवडतो का? ते आम्हाला नक्की सांगा आणि त्याची पत्नी आपल्याला कशी वाटते ते देखील सांगा.

Team Hou De Viral