50 चा दशकामध्ये सुपरहिट ठरलेली ही अभिनेत्री आज जगतेय ‘वृद्धाश्रमात’ हलाखीचे जीवन, झालीये अशी अवस्था

50 चा दशकामध्ये सुपरहिट ठरलेली ही अभिनेत्री आज जगतेय ‘वृद्धाश्रमात’ हलाखीचे जीवन, झालीये अशी अवस्था

मराठी चित्रपट सृष्टी असो का बॉलीवूड. एकदा का आपल्या अभिनयाला उतरती कळा लागली की तुम्हाला कोणीही विचारत नाही, याचा अनुभव अनेक कलाकारांनी आजवर घेतलेला आहे. असे अनेक कलाकार बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत देखील आहेत की, ज्यांना वृद्धाश्रमात राहावे लागले. बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना देखील शेवटच्या दिवसांमध्ये अतिशय एकटेपणाने राहावे लागले.

पैसा, संपत्ती, बंगला सगळं काही असताना देखील राजेश खन्ना यांना एकाकी जीवन जगावे लागले होते. शेवटच्या क्षणाला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली जरूर. मात्र, शेवटी ते एकाकी जगत असल्याचे देखील कळत होते. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक असे अभिनेते आहेत की, ज्यांना आयुष्याच्या शेवटी एकटेपणाने राहावे लागले. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये एका अशाच अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीने 1950 च्या दशकामध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम केले होते. पन्नास च्या दशकांमध्ये त्यांनी काम करून अनेक चित्रपटाला यशोशिखरावर नेले होते. या अभिनेत्रीचे नाव चित्रा नवाथे असे आहे. चित्रा नवाथे यांनी 1952 मध्ये आलेल्या “लाखाची गोष्ट” या सुपर डुपर हिट मराठी चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट येवढा गाजला होता की, अनेक वर्ष चित्रपटगृहात तो लागलेला होता.

त्यानंतर बहिणीच्या बांगड्या, गुळाचा गणपती हा चित्रपट देखील त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिट करून दाखवला होता. त्यानंतर राम राम पाहुणं, टिंग्या यासारखे चित्रपट देखील त्यांनी यशोशिखरावर नेले होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून चित्रा नवाथे या सध्या वृद्धाश्रमात हलाखीचे जीवन जगत असल्याचे सांगण्यात येते. चित्रा नवाथे यांच्या पतीचे नाव राजा नवाथे असे होते. राजा हे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते अभिनेते शोमन राज कपूर यांच्या सोबत त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्यानंतर चित्रा आणि राजा नावाथे यांनी लग्न केले. काही वर्षांपूर्वी चित्रा यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर राजा नवाथे यांचे देखील निधन झाले. त्यामुळे चित्रा या एकाकी पडल्या होत्या. त्यांनी आपल्या भावंडाचा आधार घेतला होता. चित्रा नवाथे यांचा येथे मोठा बंगला होता.

पायाला मोठी जखम झाल्यामुळे गेल्या वर्षी त्यांना सांताक्रुज येथील सरला नर्सिंग होम येथे ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर या नर्सिंग होम चे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. त्यानंतर चित्रा नवाथे कुठे गेल्या हे कोणाला समजले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सापडल्या नाही. त्यानंतर त्या मुलुंड येथील गोल्डन केअर वृद्धाश्रमात सापडल्या आहेत.

त्यांची बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांनी पोलिसात तक्रार देऊन त्यांचा शोध घेतलेला आहे. चित्रा यांचा जुहू येथे भला मोठा बंगला आहे. मात्र, या बंगल्याचा सध्या कायदेशीर वाद सुरू असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral