‘जीव माझा गुंतला’ मालिकेत मोठा ट्विस्ट, चित्राने जाळली अंतराची ‘हमसफर’

जीव माझा गुंतला ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये अंतराच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाण ही दिसली आहे. योगिता हिने या मालिकेमध्ये अतिशय सोज्वळ मुलीची भूमिका साकारली आहे. तर मल्हार ही भूमिका अभिनेता समीर चौगुले याने साकारली आहे.
मात्र, योगिता मालिकेत सोज्वळ दिसत असली तरी रियल लाईफ मध्ये तिने काही महिन्यांपूर्वी आणखी एक हॉट फोटोशूट केले होते. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो शूट वायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती जीन्स आणि शर्ट मध्ये दिसत आहे. ती अतिशय बोल्ड अशी दिसत आहे.
तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक देखील केल्या होत्या. तर आपल्याला अंतरा म्हणजेच योगिता चव्हाण आवडते का? ते आम्हाला नक्की सांगा.
आता जीव माझा गुंतला ही मालिका अतिशय रंजक वळणावर आल्याचे पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना देखील घडताना आपल्याला दिसणार आहेत. मालिकेमध्ये आपल्याला चित्रा ही देखील कटकारस्थान करताना दिसणारच आहे. त्यामुळे आता तिचा काहीतरी बंदोबस्त करावा अशा विचाराने अंतरा काही प्लॅन तयार करते का हे देखील पाहणे फार आवश्यक आहे.
तर अंतरा हिला आता मल्हार देखील मदत करणार का हे देखील पाहणे फार मजेशी ठरणार आहे. चित्रा ही मल्हार आणि अंतरा यांचा संसार उध्वस्त करण्याच्या मागे लागली आहे. मात्र, आता असे काही होणार नसून या मालिकेला वेगळी ओळख लागण्याची शक्यता आहे.
मालिकेमध्ये आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की, मल्हार आणि अंतरा हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पूजा करत बसलेले असतात. यासाठी सगळी सामग्री देखील आणण्यात आली असते. हे दोघे पूजेमध्ये अतिशय मग्न असतात, तर दुसरीकडे चित्रा ही एक वेगळाच कट करत असते आणि या कटाला ती अंतिम स्वरूप देखील देते.
मात्र, तिचा हा कट आता पुढे उधळून लावण्यात येणार आहे. हे दोघेजण पूजा करत असताना बाहेर काहीतरी जळाल्याचे घरामध्ये कळते. त्यानंतर मल्हार आणि अंतरा हे दोघेही बाहेर जातात आणि पाहतात तर काय हमसफर ही जळत असते, हे पाहून अंतरा हिला चांगलाच धक्का बसतो. आता माझ्या हमसफर ला कोणी जाळले, असा प्रश्न तिला पडतो आणि हे चित्र पाहून ती खूपच हवालदिल होते. ती खूप रडत असते.
मात्र, तिला आता शंका येते की हे सर्व कोणी केले आहे. त्यामुळे आता अंतरा ही सुडाने उठते आणि आता चित्रा हिचा आपण बंदोबस्तच करायचा, असे ठरवते. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये नेमके काय होते, हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे, तर आपण जीव माझा गुंतला ही मालिका पाहतात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.