मनोरंजन विश्वाला धक्का ! ‘राजू श्रीवास्तव’ नंतर आता आणखी एका कॉमेडियनचे झाले निधन

मनोरंजन विश्वाला धक्का ! ‘राजू श्रीवास्तव’ नंतर आता आणखी एका कॉमेडियनचे झाले निधन

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी जवळपास दीड महिना मृत्यूची झुंज दिल्यानंतर त्यांचे अखेरीस नुकतेच निधन झाले होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी मनाला चटका देणारी होती.

मात्र, आता देखील मनोरंजन क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विनोदी कलाकाराचे निधन झाले आहे. लाफ्टर चालेंज या शो पहिला सीजनमध्ये हा कलाकार दिसला होता. प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि सगळ्यांना सांगितले आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुखद बातमी समोर आली आहे. दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या निधनानंतर आता आणखी एका कॉमेडियनने या जगाचा निरोप घेतला आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनमधील कंटेस्टेंट पराग कंसाराचे निधन झाले आहे. पराग कंसाराचा मित्र आणि पसिद्ध कॉमेडियन सुनील पालने एक व्हिडीओ शेयर करून त्याच्या निधनाची बातमी दिली.

पराग कंसारा हे गुजरातच्या वडोदरा शहरात राहणारे होते. पराग कंसारा हे अतिशय जबरदस्त असे विनोदी होते. लाफ्टर चॅलेंज याच्या पहिल्या शोमध्ये ते दिसले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रापासून दूर गेले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळत आहे. अशातच त्यांच्या निधनाची बातमी सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे.

दीपेश भान, राजू श्रीवास्तव यांच्या नंतर पराग कंसारा यांचेही निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सेशनमध्ये ते आपल्याला दिसले होते. मात्र, त्यांना या शोचा किताब मिळू शकला नव्हता, असे असले तरी त्यांनी सगळ्यांचे खूप मनोरंजन केले होते. त्यानंतर सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.

त्या नंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये त्यांनी काम केले होते. त्यांची वेगळी अशी ओळख होती. गुजराती अनेक मालिका आणि चित्रपटातही त्यांनी काम केले होते. आता त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रांमध्ये एक वेगळ्या प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे, असे म्हणावे लागेल.

Team Hou De Viral