आर्यन खानसोबत मॅच पाहायला आलेली ही मिस्ट्री गर्ल कोण? या अप्सरेनं वेधलं सर्वांचं लक्ष

आर्यन खानसोबत मॅच पाहायला आलेली ही मिस्ट्री गर्ल कोण? या अप्सरेनं वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा काही महिन्यापूर्वी वादात सापडला होता. याचं कारण म्हणजे त्याचा मुलगा आर्यन खान हा होता. क्रूज वर ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर काही दिवस त्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागली.

मात्र, नंतर त्याचा जामीन झाला. शाहरुख खान यांची या प्रकरणात प्रचंड बदनामी झाली, असे बॉलिवूडमध्ये सांगण्यात येते तर आर्यन खान काही दिवस हा घराच्या बाहेर पडला नाही. मात्र, आता तो पुन्हा एकदा बाहेर फिरताना दिसत आहे. नुकताच तो वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग यांचा सामना पाहण्यासाठी आला होता.

बॉलिवूडमध्ये स्टार अभिनेत्री असलेली आणि त्यांची मुलं हे कायम चर्चेत असतात. त्यामध्ये चंकी पांडे याची कन्या अनन्या पांडे हीदेखील शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हे सर्व स्टार किड ची मुलं सर्वत्र पार्टीला एकत्र जाताना दिसतात. जान्हवी कपूरची आता त्यात भर पडली आहे, तर आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना खान हे देखील आता मोठ्या प्रमाणात पार्टीत दिसत आहेत.

काही महिन्यापूर्वी आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर समीर वानखेडे हेदेखील चर्चेत आले. समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीकेची झोड उठवली होती.

मात्र त्यानंतर आता ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांनाच अटक करून तुरुंगात डांबले आहे. आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. एकूणच समीर वानखेडे यांचीही या प्रकरणात प्रचंड बदनामी झाली. त्यांचा बचाव करण्यासाठी पत्नी क्रांती रेडकर हिला देखील समोर यावे लागले होते. तिनेदेखील पत्रकार परिषद घेऊन आपली पकी समीर वानखेडे यांची बाजू मांडली होती.

एकूण या प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांना सोडून देण्यात आल्याचा समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील यामुळे चर्चेत आला. आर्यन खान हा शाहरुख खानच्या अनुपस्थितीमध्ये कोलकता नाईट राईडरच्या लिलावाच्या वेळेस देखील उपस्थित होता.

आता देखील वानखेडे स्टेडियमवर नुकताच चेन्नई सुपर किंग्स वर्सेस कोलकत्ता नाइट रायडर्स यांचा सामना झाला. या सामन्याच्या दरम्यान आर्यन खान हा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बालकनीत मॅच पाहत होता. याच वेळेस आर्यन खान याच्यासोबत एक तरुणी दिसली होती.

ही तरुणी नेमकी कोण आहे, याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, ही आर्यन खानची गर्लफ्रेंड आहे का? आणखीन कोणी आहे, असे विचारले जात आहे. मात्र, ती तरुणी जुही चावला यांची मुलगी जान्हवी मेहता ही आहे. आर्यन आणि जान्हवीचे फोटो आता वायरल झाल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

Team Hou De Viral