दररोज ‘दही’ खाल्ल्याने आपल्याला मिळतात हे जबरदस्त फायदे !

भारतीय पदार्थांमध्ये आणि जेवणातही दह्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दही आरोग्यासाठीही पौष्टीक तसेच पचायलाही सोपे असते. दह्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते.
खाल्लेल्या अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यासाठी दही उपयुक्त असते. आहारात दही असायला हवे असे म्हटले जाते पण याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत ते आपल्याला माहित नसतात. पाहूयात दररोज दही खाण्यामुळे नेमके काय फायदे होतात.
प्रतिकारशक्ती वाढते
दह्यातील घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. हवामानातील घटक आपल्या आरोग्याशी निगडीत असतात. हवामानबदलामुळे जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र आहारात दह्याचा समावेश केल्यास हा संसर्ग होण्यापासून आपला बचाव होतो.
रक्तदाबावर नियंत्रण
सध्या अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. मात्र दह्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. हृदयविकारासारख्या आजारांची शक्यता नियमित दही खाल्ल्याने कमी होते. दही, दूध आणि पनीर हे घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. पण यामध्ये दही सर्वात चांगले असते.
कोंडा कमी करण्यास उपयुक्त
केसांमध्ये कोंडा असण्याची समस्या सध्या अगदी सामान्य आहे. दही केसांच्या मूळांशी लावल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारात दह्याचा समावेश करायला हवा असे आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. हायपर टेन्शन, लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलशी निगडीत समस्या असतील तर त्या कमी होण्यासाठी दह्याचा वापर उपयुक्त ठरतो.
चेहरा उजळविण्यासाठी उपयुक्त
दह्यामध्ये व्हिटॅमिन ई, झिंक आणि फॉस्फरस हे घटक असतात. फेसपॅकमध्ये दही मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. असे आठवड्यातून किमान २ वेळा केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.