दह्यात भाजलेले जिरे टाकून त्याचे सेवन केल्यास होतात ‘हे’ चमत्कारी फायदे!

दह्यात भाजलेले जिरे टाकून त्याचे सेवन केल्यास होतात ‘हे’ चमत्कारी फायदे!

दही म्हणजे आपल्या दैनंदीन आहारातील एक प्रमुख पदार्थ, काहींच्या घरात तर रोज जेवणानंतर दही खाल्ले जातेच. गावाला तर प्रत्येक घरात दुधापासून दही बनवतातच. दही जास्त खाण्यामागे कारण देखील तसचं आहे. दही हे अतिशय पौष्टिक असल्याचे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राने सुद्धा मान्य केले आहे, त्यामुळे दही सेवन करण्याने शरीराला लाभच होतो. पण तुम्हाला माहित आहे का फक्त दही खाण्यापेक्षा त्यात जर तुम्ही भाजलेले जिरे टाकले तर त्याची पौष्टिकता किती पटीने वाढते?

जर तुम्ही दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून त्याचे सेवन केले तर दोन्ही पदार्थांतील पोषक तत्वे तर तुमच्या शरीराला मिळतातच पण सोबत ते चवीला सुद्धा चांगले लागते. आज आपण जाणून घेऊया याच मिश्रणाचे फायदे, नक्की काय फायदा होतो दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाल्ल्यास? चला जाणून घेऊया

भूक वाढवण्यात होईल मदत – दही आणि भाजलेल्या जिऱ्याचे सेवन केल्याने तुम्हाला सगळ्यात पहिला होणारा फायदा म्हणजे शरीराची भूक खूप वाढते. हे मिश्रण त्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरते ज्यांना भूक लागत नाही आणि ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे.

बॉडीबिल्डींग करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा आवर्जून दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचा सल्ला दिला जातो. हे मिश्रण खायला सुरुवात केल्यास काहीच दिवसांत याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो. दही आणि जिरे दोन्हीमध्ये असे गुणधर्म असतात जे शरीरातील पचन क्रिया वाढवतात ज्यामुळे व्यक्तीला जास्त भूक लागते.

बद्धकोष्ठतेवर गुणकारी – बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात आणि आजकाल हि समस्या तरुणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. दही आणि जिऱ्यात फायबरची जास्त मात्रा असल्याने पचन क्रिया सुस्थितीत राखण्यासाठी ते प्रभावी रुपात कार्य करते.

फायबर पोषक तत्वांच्या समावेशामुळे याचं नियमित रूपाने सेवन करणाऱ्या लोकांची पचन क्रिया तर सुधारतेच पण सोबत बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील त्यांची सुटका होते. तुम्ही हवं तर लस्सी बनवून त्यात भाजलेली जीरा पावडर मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.

डोळे निरोगी राहतात – दही आणि जिरे जीवनसत्व ‘अ’ चे चांगले स्त्रोत मानले जातात. या दोन्ही खाद्यपदार्थांचमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची योग्य मात्र सापडते. नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनने सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली आहे.

की दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि डोळ्यांचे आरोग्य सुद्धा सुरक्षित राखण्यासाठी सुद्धा हे मिश्रण अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला डोळ्यांची काही समस्या असेल तर तुम्ही आवर्जून दही आणि जिरे यांचे सेवन केले पाहिजे.

रक्तदाब संतुलित राहिल – उच्च रक्तदाबाच्या समस्येने आज सगळीकडेच थैमान घातले आहे. यापासून बचाव म्हणून दही आणि भाजलेले जिरे यांचे सेवन अतिशय लाभदायी ठरते. यामागचं वैज्ञानिक कारण पाहिलं तर दही आणि जिरे यात एक महत्त्वाचं पोषक तत्व असतं.

या कारणामुळे जर तुम्ही या दोन्ही पदार्थांच एकत्रित मिश्रण सेवन करता तर तुमचा रक्तदाब संतुलित राखण्यासाठी खूप मदत होईल. तुमच्या ओळखीच्या कोणा व्यक्तीला सुद्धा असा काही त्रास असेल तर आवर्जून त्यांनाही हा उपाय ट्राय करायला सांगा.

मधुमेहापासून बचाव – मधुमेहाच्या समस्येशी आज भारतभर हजारो लोक झगडत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे लोकांचं आपल्या खाण्या पिण्यावर नियंत्रण नाही. यामुळेच शरीरातील शुगर लेव्हल वाढत जाते आणि आपलं शरीर मधुमेहाला बळी पडतं. यावर उपाय म्हणून दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाणे फायदेशीर ठरू शकते.

ज्या लोकांच्या घरी कोणालाच मधुमेह नाही त्यांनी तर आवर्जून या मिश्रणाचे दरोरोज सेवन करायला हवे, जेणेकरून ते कधीच मधुमेहाला बळी पडणार नाहीत. तर मंडळी असे आहेत दही आणि जिरे यांचे हे मिश्रण खाण्याचे फायदे! तुम्ही हे मिश्रण नियमित खाल्लंत तर अजूनही अनेक आजारांपासून तुमचा बचाव तर होईलच, पण सोबत तुमचे शरीर सुद्धा सक्षम आणि निरोगी राहील.

Team Hou De Viral