‘तारे जमीन पर’ मधला छोटा कलाकार आता झाला आहे 23 वर्षाचा, दिसतो बॉलीवूड अभिनेत्यांपेक्षाही अधिक हॅन्डसम, पाहून थक्क व्हाल!

2007 मध्ये आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सर्वात कलाकार इशान तुम्हाला आठवतच असेल. त्याचे खरे नाव दर्शील सफारी आहे. 9 मार्च 1997 रोजी मुंबई इथे त्याचा जन्म झाला होता. आता तो 23 वर्षांचा झाला आहे. इशान म्हणजेच दर्शील सफारीने आपल्या पहिल्याच चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांची मने जिंकली.
लहान वयातच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मुलगा आता मोठा झाला आहे. दर्शील आता बॉलिवूडमध्ये आपले करियर करण्यासाठी सज्ज झाला आहे. दर्शील सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे आणि आपले फोटो शेअर करत राहतो. या फोटोंमधून असे दिसून येते की दर्शिल आता खूप स्मार्ट झाला आहे.
या 12 वर्षात दर्शीलची उंची आणि चेहरा खूप बदलला आहे. आणि हे बदल असे आहेत की आपण त्याला ओळखू शकणार नाही. दर्शीलची काही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तो अनेकदा त्याचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो.
दर्शीलने तारे जमीन पार या चित्रपटानंतर ‘क्विकी’ चित्रपटासह मोठ्या पडद्यावर पुन्हा नव्याने प्रवेश केला. या चित्रपटाच्या पोस्टरला टॅग लाईनही देण्यात आली होती – ‘नो बफरिंग, नो क्लेश’. हा चित्रपट फारसा चालू शकला नाही. परंतु यामधील दर्शिल चे रूप पाहून सर्वानाच चांगला धक्का बसला.
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. आजच्या तंत्रज्ञानाने भरभराट होणाऱ्या नात्यावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप अटलुरी यांनी केले होते. या चित्रपटात दर्शील मुख्य भूमिकेत दिसला होता. ही एक प्रेमकथा होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.