DDLJ चित्रपटात काजोलने लहान स्कर्ट घालण्यामागे आहे धक्कादायक कारण

DDLJ चित्रपटात काजोलने लहान स्कर्ट घालण्यामागे आहे धक्कादायक कारण

बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला रिलीज होऊन नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि यासोबतच ट्विटरवर आदित्य चोप्रा यांचे नावदेखील चर्चेत आले होते. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचे या चित्रपटासाठी सगळे आभार मानत आहेत.

हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात असा एक चित्रपट नाही ज्याने २५ वर्षांपर्यंत चित्रपटगृहात अधिराज्य गाजविले. चित्रपटाच्या स्टोरीपासून संगीतसाठी आदित्य चोप्रा यांचे आभार मानत आहेत. तब्बल २५ वर्षांपूर्वी जेव्हा दिलवाले दुल्हनिया थिएटरमध्ये रिलीज झाला होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला होता.

या चित्रपटातून शाहरूख खान आणि काजोल यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या चित्रपटातील लव्ह स्टोरी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज या चित्रपटाशी निगडीत एक इंटरेस्टिंग स्टोरी समोर आली आहे.खरेतर डीडीएलजेमधील मेरे ख्वाबों में जो आएमधील एका सीनमध्ये काजोलने पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट परिधान केला आहे आणि पावसात डान्स करताना दिसते आहे.

खरेतर या गाण्याच्या शूटआधी काजोलचा स्कर्ट एवढा छोटा नव्हता. मीडिया रिपोर्ट्स नुसार,जेव्हा काजोल या गाण्याच्या शूटिंगसाठी गेली तेव्हा तिचा स्कर्ट इतका छोटा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार काजोल या गाण्याची शूटिंग करण्यासाठी गेली तेव्हा तिचा स्कर्ट थोडा मोठा होता. आदित्य चोप्राला काजोलच्या स्कर्टची लांबी आवडली नव्हती.

त्यामुळे त्याने डिझायनर मनीष मल्होत्राला सांगून स्कर्ट कापून छोटा केला होता.जेव्हा मनीष मल्होत्राला काजोलचा स्कर्ट छोटा करत होते तेव्हा त्याच्याकडून ती जास्तच छोटा झाला. मग नाईलाजास्तव त्याच छोट्या स्कर्टमध्ये काजोलला डान्स करावा लागला होता. मात्र ते गाणं रिलीज झाल्यावर इतके हिट झाले की सर्वत्र काजोलची चर्चा होऊ लागली.

यासोबतच या गाण्यात काजोल एक सीन टॉवेलमध्ये डान्स करताना दिसते आहे. त्यासाठी काजोल कंम्फर्टेबल नव्हती. मात्र आदित्य चोप्राने समजवल्यानंतर ती या गाण्यात टॉवेल घेऊन डान्स करायला तयार झाली होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral