दुःखद ! दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती गंभीर, असल्या अवस्थेत..

दुःखद ! दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती गंभीर, असल्या अवस्थेत..

बॉलीवूडमध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांनी गोड अशा चिमुकलीला जन्म दिला आहे. त्यानंतर या दांपत्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये इतर काही कलाकारांनी देखील गोंडस मुलांना जन्म दिल्याचे उदाहरण देखील आपल्या समोर आहेत. काही दिवसांपूर्वी मालिका विश्वामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने देखील अकरा वर्षांमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याची बातमी आपण ऐकली असेल. या अभिनेत्रीचे नाव देबीना नाव बॅनर्जी असे आहे.

देबीना हिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिने काम केलेली सीता देवीची भूमिका ही प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. या भूमिकेनंतर सर्व स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. मात्र, आता देबीना ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने दुसऱ्यांदा एका चिमुकलीला जन्म दिला आहे.

याबाबत गुरमीत आणि देबिना या दोघांनीही सोशल मीडिया अकाउंट करून आपल्या चाहत्यांना माहिती देऊन सांगितले आहे की, आमच्या घरी एका चिमुकल्या परिचे आगमन झाले आहे. मात्र, विशेष म्हणजे यावेळेस देबिना हिने सातव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे ती आधीच गरोदर होती का? तिची प्रीमॅच्युअल डिलिव्हरी झाली का याबाबत काही समजू शकले नाही.

आता अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिने आपल्या प्रकृतीबाबत माहिती देऊन चहात्यांना सांगितले आहे की बाळाच्या जन्मानंतर माझी प्रकृती ही जरा नाजूकच झाली आहे. मात्र, काही वेळेस आपण खंबीर झाल्याशिवाय पर्याय नसतो, असे तिने म्हटले आहे. बाळ झाल्यानंतरच जग हे काही वेगळेच असतं. आपल्याला या जगामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने वावरावे लागतं.

येथे खूप काळजी देखील घ्यावी लागते, असे तिने म्हटले आहे. त्याचबरोबर आपल्या आरोग्यविषयी माहिती देताना तिने सांगितले आहे की, बाळाच्या जन्मनंतर माझी प्रकृती थोडी नाजूक झाली आहे. तिने याबाबत एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे पाय हे सुजल्याचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हाताला देखील तिच्या थोडी सूज असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे तिने सांगितले आहे की, आता माझी प्रकृती अशी झाली आहे. मात्र, काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते. त्याचबरोबर आता लवकरच मी यातून देखील बाहेर पडेल,असे तिने म्हटले आहे. तर आपल्याला देबिना बॅनर्जी ही आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral