निव्वळ फालतूपणा ! असं कधी होतं का? ‘गहराइयां’ मधील ती चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

निव्वळ फालतूपणा ! असं कधी होतं का? ‘गहराइयां’ मधील ती चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

चित्रपट म्हटले की त्यामध्ये सगळं काही सत्य असते असेच काही नाही. समाज मनाचा आरसा म्हणजे चित्रपट असतात. आपल्या आजूबाजूला जे घडतं तेच चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मात्र, अनेक चित्रपट काल्पनिकच असतात.

मात्र दिग्दर्शक किंवा लेखकाला चित्रपट लिखाणाची कल्पना ही आपल्या समाजाच्या माध्यमातूनच मिळत असते. हे सत्य आपण नाकारून चालत नाही. त्यामुळेच आपण चित्रपट पाहताना अनेकदा आपल्या स्वतःला चित्रपटांमध्ये ठेवून पाहत असतो. त्यामुळे आपल्याला एखादा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी आपण त्यामध्ये स्वतःला ठेवून पाहिले तर तो चित्रपट आपल्याला आवडून जातो.

अनेक चित्रपटांमध्ये सीन चित्रित करताना चुका होताना दिसत असतात. मात्र, या चुका अनेकदा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लक्षात येत असतात. आतादेखील नुकताच प्रदर्शित झालेला गहिराईया चित्रपटातील काही चुका एका व्यक्तीने लक्षात आणून दिलेल्या आहेत. अनेकदा चित्रपटामध्ये चित्रीकरण करत असताना एखादा कलाकार नेहमी हातात वस्तू पकडतो.

मात्र, प्रत्यक्षात त्याच्या हातामध्ये अशी कुठलीही वस्तू नसते किंवा चित्रीकरणाच्या दुसर्‍या भागामध्ये ती वस्तू दुसऱ्या स्वरूपात आढळते. त्यामुळे अनेकदा लोक हे चुका निदर्शनास आणून देतात. गहिराईया चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटांमध्ये नातेसंबंधावर आधारित भाष्य करण्यात आले आहे. अनैतिक संबंधावर आधारित हा चित्रपट आहे. दीपिका पादुकोण हिचे आपल्या चुलत बहिणीच्या पतीसोबत प्रेमप्रकरण सुरू असते, असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी याने दीपिकासोबत अनेक हॉट दृश्य दिले आहेत. सिद्धांत चतुर्वेदी याने गली बॉय या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात दीपिका पदुकोण हीचा पती अभिनेता रणवीर सिंह दिसला होता. गहिराईया चित्रपटातील चुका निदर्शनास आणून देताना एका व्यक्तीने दोन स्क्रीन शॉट शेअर केले आहे. त्या फोटोमध्ये अनन्या पांडे दिसत आहे. या फोटोत तिच्या हातामध्ये एक ग्लास दिसत आहे. पहिल्या फोटोतील आणि दुसऱ्या फोटोतील ग्लास हा वेगवेगळा आहे.

हाच स्क्रिनशॉट या व्यक्तीने शेअर केला आहे. त्यामुळे या चित्रपटातील चूक अनेकांच्या लक्षात आलेली आहेत. तसेच त्याच व्यक्तीने ही चूक निदर्शनास आणून देण्यासाठी या चित्रपटाचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. अनन्या पांडे ही बाल्कनीमध्ये उभी असताना तिच्या हातामध्ये एक ग्लास असतो आणि ती ज्यावेळेस बेडवर येऊन बसते त्यावेळेस तिच्या हातामध्ये दुसराच ग्लास असतो.

ही चूक त्याने निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे अनेकांनी याला ट्रोल केले आहे.

Team Hou De Viral