‘बिगबॉस’ च्या घरामध्ये तृप्ती देसाईंने महिला स्पर्धकांसोबत केले असले कृत्य, ते पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले

‘बिगबॉस’ च्या घरामध्ये तृप्ती देसाईंने महिला स्पर्धकांसोबत केले असले कृत्य, ते पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले

कलर्स मराठी या वाहिनीवर 19 सप्टेंबरपासून मराठी बिग बॉस हा शो सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दिवसापासूनच या शोमध्ये वादाचे अनेक प्रसंग घडताना दिसत आहेत. यामध्ये पहिल्याच दिवशी मीरा जगन्नाथ हिचा स्नेहा वाघ यांच्याशी वाद झाला होता. भांडणाचे कारण हे अतिशय किरकोळ असे होते. मीरा हिला सकाळचा नाश्ता भेटला नव्हता.

त्यामुळे ती स्नेहा त्याच्यावर जाम भडकली होती. त्यानंतर स्नेहा वाघ हिने देखील मीरा हिला सुनवले. हा काहीसा प्रकार नंतर जेवणाच्या वेळेस देखील झाला. दुपारच्या जेवणामध्ये स्नेहा हिने जेवण बनवले आणि ते मीरा हिच्या समोर आणून ठेवले. त्यामुळे मीरा ही चांगलीच भडकली. या शोमध्ये आणखीन एक महिला स्पर्धक सहभागी झाली आहे.

त्यांचे नाव आहे भुमता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई. तृप्ती देसाई यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. याच प्रमाणे महिलांसाठी त्या आंदोलन करून प्रसिद्धी देखील मिळत असतात. तृप्ती देसाई यांनी काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, यासाठी आंदोलन उभारले होते.

मात्र, त्यांच्या या आंदोलनांना वेगळ्या पद्धतीची किनार मिळाली होती. शनिशिंगणापूर येथील मंदिरात महिलांना अजिबात प्रवेश देण्यात येत नाही आणि तृप्ती देसाई या मंदिरात प्रवेशाची मागणी करत होत्या. त्यामुळे त्यांना मंदिराच्या बाहेरच रोखण्यात आले होते. याचबरोबर त्यांनी त्र्यबकेश्वर येथील मंदिरात देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

या वेळी तेथे मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. तृप्ती देसाई म्हटले की वाद हा आलाच. तृप्ती देसाई यांनी काही वर्षापूर्वी अजित पवार यांच्याशी संबंधित एका बँकेत विरोधातही आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. याचप्रकारे त्यांनी मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, यावेळी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता आणि त्यांनी तृप्ती देसाई यांना दर्ग्यामध्ये येण्यापासून रोखले होते. आता बिग बॉसच्या घरामध्ये नवनवीन टास्क देण्यात येतात. या टास्क मध्ये अनेक स्पर्धक हे सहभागी होऊन विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर घरामध्ये दोन गट तयार करण्यात आले होते.

या दोन गटांमध्ये, एक दुचाकी देण्यात आली होती. या दुचाकी वर बसलेल्या लोकांना उठवायचा हा टास्क होता. मात्र, यासाठी घाणेरडा प्रकार करायचा नव्हता. मात्र, तृप्ती देसाई यांनी बाईकवर बसलेल्या सुरेखा कुडची आणि इतर महिला वर्गावर घरातील कचरा फेकला. त्याचप्रमाणे बाथरूम मधील साबणाचे पाणीदेखील फेकले.

त्यानंतर तृप्ती देसाई यांना सोशल मीडियावर अनेकांनी शिव्या देखील घातल्या. अनेक जण म्हणाले की, जी व्यक्ती महिलांच्या बाबतीत एवढे आंदोलन करते आणि ती महिलांचा सन्मान करू शकत नाही, हे अतिशय चुकीचे असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले. त्यामुळे आता तृप्ती देसाई यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

Team Hou De Viral