‘आता पुढचा प्रवास हिच्या सोबत..’ देवमाणूस फेम किरण गायकवाडच्या कुटुंबात नवीन व्यक्तीची एंट्री

‘आता पुढचा प्रवास हिच्या सोबत..’ देवमाणूस फेम किरण गायकवाडच्या कुटुंबात नवीन व्यक्तीची एंट्री

देव माणूस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र देव माणूस मालिकेचा दुसरा भाग हा चांगला झाला नाही. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मध्यंतरी या मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली होती.

या मालिकेमध्ये आपल्याला देव माणूस म्हणजेच देवीसिंह उर्फ डॉ. अजितकुमार देव याच्या भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड हा दिसला आहे. किरण गायकवाड याने अतिशय जबरदस्त भूमिका या मालिकेत केली आहे. त्याप्रमाणेच एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेत आपल्याला नेहा खान ही पहिल्या भागामध्ये दिसली होती.

तर आता दुसर्‍या भागामध्ये सरू आजी, टोण्या बज्या या भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. देव माणूस मालिकेतून घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजित कुमार देव म्हणजेच किरण गायकवाड प्रेक्षकांच्या पसंतीस ठरला आहे. किरण ची भूमिका या मालिकेत नकारात्मक असली तरी मात्र प्रेक्षक किरण वर भरभरून प्रेम देत असल्याचे दिसून येत आहे.

लागिर झालं जी या मालिकेतील भैय्या साहेबांची भूमिका पार पाडली होती. ही भूमिका पार पाडत असताना देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. सोशल मीडियावर देखील तो खूप सक्रिय असतो. किरण गायकवाड याने मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तो बोलताना दिसत होता की, माझ्या आईला माझी देव माणूस मालिकेतील भूमिका ही अजिबात आवडत नाही.

याचे कारण म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणी या तिला सांगत असतात की, तुझ्या मुलाला अशा भूमिका करायला नको सांगू. त्यावर मी माझ्या आईला सांगितले की, माझी भूमीका आवडत नाही म्हणजेच त्या भूमिकेची ते यश आहे. म्हणजे मी भूमिका उत्तम प्रकारे केली आहे. अशी त्याची पावती आहे, असे आईला सांगितले, त्याने सांगितले.

किरण गायकवाड मध्यंतरी दुसऱ्या एका मालिकेत देखील आपल्याला दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, तो सध्या देव माणूस दुसऱ्या भागातील दिसत आहे. किरण याने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो कार सोबत दिसत आहे. पुढे त्याने म्हटले आहे की, आता पुढचा प्रवास हिच्यासोबत.

हा व्हिडिओ पाहून किरणच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. किरणने किया कंपनीची कार खरेदी केली आहे. किया कारची किंमत ६.२५ लाखांपासून सुरू होते. सर्वात महाग अशा किया कारची किंमत २५.४८ लाखांपासून सुरू होते. किरण याला या नव्या कारबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Hou De Viral