या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा पती आहे क्रिकेटपटू..

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा पती आहे क्रिकेटपटू..

क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राचे असे नाते हे जुनेच आहे. अनेक खेळाडू यांचे अभिनेत्रींसोबत लग्न झालेले आहे. यामध्ये आपल्याला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे उदाहरण घेता येईल. त्याचप्रमाणे इतर काही खेळाडू देखील आहेत. मराठीमध्ये देखील असे अनेक खेळाडू आहेत की, ज्यांचे अभिनेत्रींसोबत लग्न झाले आहे.

यामध्ये आपल्याला जहीर खान आणि सागरिका घाटगे या दोघांचं नाव घेता येईल. सागरिका हिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे, तर जाहीर खान हा क्रिकेटपटू आहे. मात्र आज आम्ही आपल्याला ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत ती जोडी ती विशेष आहे. मराठी अभिनेत्री आणि मराठीच क्रिकेटपटू आशा जोड्या फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आपल्याला आज अशाच एका जोडी बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीचे नाव धनश्री दामले आहे. धनश्री दामले ही मराठीतील एक सुप्रसिद्ध निवेदिका म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मात्र, मध्यंतरी तिने काही मालिका आणि नाटकांतील काम केले होते. मात्र ती केवळ आता सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत असते.

अभिनेत्री धनश्री दामले हिचं नाव फार कमी जणांना ठाऊक असेल. सुगरण या सुप्रसिद्ध कुकिंग शोमधून धनश्रीचा नाव घराघरात पोहोचलं. तिची निवेदनाची अनोखी स्टाइल सर्वांना आवडली. धनश्री हिचे लग्न झाले असून तिचा नवरा क्रिकेट क्षेत्राशी निगडित आहे. त्याचं नाव सर्वेश दामले आहे, सर्वेश याने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतलं आहे.

डी. वाय. पाटील क्रिकेट संघाकडून तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. क्रिकेट स्पर्धेत सर्वेश याने सिद्धेश लाडसोबत शतकी खेळी केली होती. गेली अनेक वर्ष क्रिकेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वेशची अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर अशा अनेक स्टार खेळाडू सोबत मैत्री झाली आहे. सर्वेश आणि धनश्री यांच प्रोफेशन एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळे आहे.

पण तरीही त्यांची जोडी मात्र चर्चेत असते. धनश्री हिने कॉलेजच्या काळात अनेक एकांकिका आणि नाटकांमधून अभिनय केला आहे. परंतु नाटकांच्या रेयालसल उशिरापर्यंत चालायच्या. त्यामुळे घरी जायला उशीर व्हायचा. म्हणून धनश्री हिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून निवेदनाच क्षेत्र जवळ केले.

आज एक यशस्वी निवेदिका म्हणून धनश्री कडे पाहिलं जातं. तिने अनेक भाग केलेले आहेत. याशिवाय स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित ‘हम गया नही जिंदा है ‘ या सिनेमात अभिनय केला, तर तुम्हाला धनश्री आणि सर्वेश या नवरा बायकोची जोडी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा.

Team Hou De Viral