मधुमेह, रक्तदाबाच्या समस्यांमध्ये फायदेशीर आहे ‘धणेपूड’ , जाणून घ्या याचे इतरही गुण

मधुमेह, रक्तदाबाच्या समस्यांमध्ये फायदेशीर आहे ‘धणेपूड’ , जाणून घ्या याचे इतरही गुण

भारतात प्रत्येक घरी धण्याच्या सुकलेल्या फळांचा वापर मसाला म्हणून केला जातो. धणे हा एक मसालाच नाही, तर औषधही आहे. जर आपण याचा वापर दररोज करत असाल तर आपल्या अन्नाची चव तर वाढेलच, याशिवाय पचनतंत्र आणि मूत्रविकारासारख्या आजारांपासूनही आराम मिळतो. धणेपुडीत जीवनसत्त्व अ आणि क याशिवाय के आणि ई हेदेखिल मुबलक प्रमाणात असतात. याचा वापर वजन कमी करण्यासाठीही केला जातो. जर आपण नियमितपणे धणेपूड घेतली तर अनेक रोगांपासून आपला बचाव होतो. जाणून घेऊया काय आहेत धणेपूड दररोज घेण्याचे फायदे –

रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी असते सहाय्यक – धणेपूड ही रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी एंझाईम्सची हालचाल वाढवून रक्तातील शर्करा कमी करण्यास मदत करते. जर आपण दररोज धने पावडर वापरत असाल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

पचनक्रिया करते मजबूत – धणेपडू पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटाच्या समस्याही दूर करण्यास मदत करते. जर आपण दररोज धणेपूड वापरली तर पचनासंबंधीच्या सगळ्या समस्यांपासून आपण दूर राहू शकता. धणेपुडीत असलेले तंतूमय पदार्थ या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी असते सहाय्यकारी – धण्यात असलेले ओलिक आम्ल, लिनोलिक आम्ल, पामिटिक आम्ल, एस्कॉर्बक आम्ल आणि स्टिअरिक आम्ल अशा अनेक तत्वांमुळे रक्तातील मेद कमी होतो. धणेपूड केवळ एलडीएल कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच मदत करत नाही, तर हृदयाशी संबंधित गंभीर आजारांपासूनही बचाव करते.

वजनावर ठेवते नियंत्रण – दररोज 2 चमचे धणेपूड घेतल्याने आपले वजन वेगाने कमी होऊ शकते.

रोगप्रतिकारशक्ती ठेवते मजबूत – यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट गुण असतात जे शरीरातली सूज कमी करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात. रोज धणेपूड घेतल्याने शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा विकास धीमा होतो.

हृदय ठेवते आरोग्यपूर्ण – जाणकारांच्या मतानुसार धणेपूड ही हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यातही महत्त्वपूर्ण असते. आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर काढण्यासाठी ही मदत करते. रोज याचे सेवन केल्याने अनेक घातक रोगांपासून बचाव होतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral