धोनी चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त

धोनी चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त

भारतीय क्रिकेट विश्वामध्ये आजवर अनेक खेळाडू होऊन गेले. यामध्ये अनेक खेळाडूंची कारकीर्द देखील खूप गाजली. कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यापासून आजच्या विराट कोहली यांच्यापर्यंत सर्वांनाच क्रिकेट खेळताना अनेकदा दुखापतीला सामोरे जावे लागले.

मास्टर सचिन तेंडुलकर याच्या बाबतीत तर दुखापत ही जणू काही समीकरण जोडल्या गेले होते. टेनिस एल्बो आणि इतर आजारांनी सचिन हा कायम त्रस्त असायचा. मात्र, असे असतानाही तो भारतीय क्रिकेट विश्वासाठी पराक्रम करून दाखवायचा हे देखील तेवढेच खरे आहे. त्याच काळामध्ये श्रीनाथ, अनिल कुंबळे यासारखे क्रिकेटपटू देखील कुठल्या ना कुठल्या दुखण्याने त्रस्त राहिले.

कुंबळे याला देखील बॉलिंग करताना प्रचंड दुखापत झाली होती, तर जवागल श्रीनाथ याचा देखील खांदा हा प्रचंड दुखायचा. निवृत्तीच्या काही वर्षा आधी जवागल श्रीनाथ यांनी आपल्या गोलंदाजीचा वेग हा काहीसा कमी केला होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून राम राम ठोकला. अलीकडच्या काळामध्ये देखील अनेक क्रिकेटपटूंना दुखापतीला समोरे जावे लागले आहे.

यामध्ये महेंद्रसिंग धोनी याचा देखील समावेश आहे. महेंद्रसिंग धोनी हा अतिशय गरीब घरातून वर आलेला आहे. अतिशय काबाडकष्ट करून त्याने क्रिकेट विश्वामध्ये आपले नाव कोरले आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आलेला एम एस धोनी हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटाला प्रचंड यश देखील मिळाले होते.

मात्र आता महेंद्रसिंग धोनी हा एका आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघातून त्याने आता निवृत्ती घेतली आहे. आयपीएल मध्ये देखील त्याने चमकदार कामगिरी केल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा गुडघे दुखीने प्रचंड त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

या गुडघेदुखीच्या आजाराला तो पारंपारिक पद्धतीने उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. ओलीओपॅथिक औषध घेण्यापेक्षा आयुर्वेदिक आणि पारंपारिक औषधांवर त्याचा अधिक भर असतो. महेंद्रसिंह हा रांची येथील रहिवासी आहे. रांचीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या एका बाबाला तो सध्या भेटला आहे.

हा बाबा एका झाडाखाली बसतो आणि रुग्णांवर उपचार करतो. आयपीएलपासून प्रसिद्धीपासून दूर असलेला धोनी आता गुडघेदुखीने आजाराने त्रस्त झाला आहे आणि आपल्या तो गावाकडे गेला आहे. वनस्पती औषधींच्या मदतीने वैद्य बंधन सिंह खरवार हे उपचार करतात.

हे बाबा सांगतात की, मी प्रत्येक रुग्णाला केवळ 40 रुपये फीस आकारतो आणि महेंद्रसिंह धोनी हा जरी आघाडीचा क्रिकेट पटू असता तरी त्याच्याकडून मी अधिक पैसे किंवा पैसे घेणार नाही, असे काही नाही. त्याच्याकडून मी देखील 40 रुपये घेईल आणि त्याच्यावर आता उपचार करेल. वैद्य बंधन सिंह रांचीपासून 70 किलोमीटर असलेल्या लापुंग पोलीस स्टेशन परिसरातील कटिंगकेला येथे गेला होता.

हा बाबा 28 वर्षापासून झाडाखाली ताडपत्री तंबू लावून वेगवेगळ्या आजारावर उपचार करत असतात आणि त्यांच्या उपचाराला अनेक जण प्रतिसाद देतात. अनेक जण बरे देखील होतात. गेल्या चार महिन्यात धोनीने येथे येऊन औषध घेतल्याचे सांगितले आहे. हे वैद्य हाडासाठी देखील वनस्पती पासून औषध देत असल्याची माहिती त्याला मिळाली होती.

यापूर्वी धोनी याच्या पालकांनी देखील या वैद्य बाबा कडून उपचार करून घेतले होते. त्यानंतर आता धोनी देखील तेथे पोहोचला आहे. संबंधित वैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता चार दिवसांनी धोनी येथे येणार असल्याची बातमी कळताच येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागते. म्हणूनच तो आता थेट गावात पोहोचतो.

गाडीत बसतो आणि जेथे त्याला औषधाचा डोस दिला जातो तिथे औषध घेतो आणि तो निघून जातो. तर अनेक जण त्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक असतात, असेही ते म्हणाले.

Team Hou De Viral