‘माझं बाळ आता या जगात नाही’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

‘माझं बाळ आता या जगात नाही’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा हिने आपल्या एका जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. याबाबत तिने अतिशय भावनिक पोस्ट केली आहे. भावनिक पोस्ट करताना ती अतिशय गहिवरली आहे, असे देखील दिसत आहे.

2000 मध्ये बॉलिवूडमध्ये एक असा चित्रपट आला होता की, ज्या चित्रपटाने सर्व तरुणांचे मन हे जिंकले होते. या चित्रपटाचे नाव होते रहना हे तेरे दिल में, या चित्रपटामध्ये आर माधवन आणि दिया मिर्झा ही जोडी दिसली होती. ही जोडी या चित्रपटात पहिल्यांदा झळकत होती. म्हणजेच या जोडीचा हा पहिलाच चित्रपट होता.

या चित्रपटातील गाणे हे एवढे गाजले होते की, आजही हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. चित्रपटातील अभिनय देखील खूप गाजला होता. दिया मिर्झाने खूप चांगले काम केले होते. या सोबत आर माधवन याने देखील चांगले काम केले होते. या सोबतच या चित्रपटांमध्ये सैफ अली खान दिसला होता. त्याने देखील अतिशय उत्कृष्ट असे काम केले होते.

त्यानंतर या चित्रपटाचा आता सिक्वल देखील येत असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाची तयारी निर्माता जॅकी भगनानी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सिक्वल देखील दर्जेदार झाला पाहिजे. अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. कारण सुरुवातीचा चित्रपट हा प्रचंड गाजला होता. आर. माधवन आणि दिया मिर्झा यांनी सिक्वलमध्ये काम करण्यास नकार दिल्याची कळत आहे.

मात्र, आता या चित्रपटात नेमके कोण काम करते, हे येणारा काळच ठरवेल. दिया मिर्झा हिला त्या नंतर काही चित्रपटात काम मिळाले. मात्र, तिला जेमतेमच यश मिळाले. रहना हे तेरे दिल मे या चित्रपटासारखे तिला यश काही मिळाले नाही. तिने संजय दत्त याच्या वरील आधारित संजू या चित्रपटात देखील काम केले होते.

तिने संजय दत्त याच्या पत्नीची भूमिका यामध्ये निभावली होती. तर संजूची भूमिका रणबीर कपूर यांनी केली होती. हा चित्रपट देखील चांगला गाजला होता. त्यानंतरही तिला काही चित्रपटात काम मिळाले. मात्र, जेमतेमच यश मिळाले. खाजगी आयुष्यात देखील दिया मिर्झाही ही अपयशी ठरली, असेच म्हणावे लागेल.

काही वर्षापूर्वी तिने उद्योगपती साहील संघासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच या दोघांचा संसार हा मोडकळीस आला. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. दिया मिर्झा यानंतर खूपच खचून गेली होती. गेल्या वर्षी तिने फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा लग्न केले. तिने वैभव रेखी या उद्योगपती सोबत लग्न केले.

आता दिया मिर्झा हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती अतिशय भावनिक झाल्याचे दिसत आहे. या मिर्झा हिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या बाळाला गमावले आहे. हे बाळ म्हणजे तिची भाची आहे. तिच्या भाचीचे नाव तानिया असे आहे. तानिया हीचा नुकताच कार अपघातामध्ये हैदराबाद येथे मृत्यू झाला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ती आपल्या मित्रांसोबत घरी परतत होती. याच वेळेस तानिया हिची कार उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दिया मिर्झा हिने तिचा फोटो शेअर करून माझ्या बाळा तुझी मला खुप आठवण येत आहे.

तुझे हसणे कायम आमच्या स्मरणात राहील. तू एवढ्या लवकर जायला पाहिजे नव्हते, असे तिने म्हटले आहे.

Team Hou De Viral