DID ची 44 वर्षांची परिक्षक गीता डेट करतेय या तरुण मुलाला

ते म्हणतात ना प्रेम हे जात वय बघून होत नाही. आणि याची बरीच उदाहरणे आपल्याला बॉलिवूड व मनोरंजन क्षेत्रामध्ये बघायला मिळतातच. अनेक अभिनेत्यांनी किव्हा अभिनेत्रीनी प्रेमाच्या सर्व सिमा पार करुन सिद्ध केलं आहे की प्रेमाला कोणतीच सिमा नसते.
बॉलिवूडच्या जगात आपल्याला अश्या बऱ्याच जोड्या पाहायला मिळतात. ज्यांच्या वयात खूप मोठा फरक असतो. असे असूनही बऱ्याच सेलिब्रिटींनी स्वत: च्या प्रेमाला सिद्ध करून दाखवले आहे. या यादीतली लोकप्रिय व्यक्ती म्हणजे गीता कपूर.
गीता कपूर ही ‘डान्स इंडिया डान्स’ या डान्सच्या कार्यक्रमाची परिक्षक आहे. गीताने अजूनही लग्न केलेले नाही परंतु, ती एका तरुण मुलाला डेट करत आहे. गीता आज एक मोठी सेलिब्रिटी, तसेच डान्स इंडिया डान्स शोची जज आणि उत्तम कोरिओग्राफर देखील आहे. सेलिब्रिटींची अशी बरीच उदाहरणे आपल्याला समोर आहेत ज्यांनी आपल्या वयाचा विचार न करता डायरेक्ट प्रेम केलं आहे.
लेटेस्टचे उदाहरण घ्यायचे झाले तर प्रियांका चोप्रा व निकच्या या दोघांच्या नात्यामध्ये निक जोनस हा वयाने प्रियांका पेक्षा कमीआहे. आपला मराठमोळा किक्रेटपटु सचिन तेंडुलकर हा देखील त्याच्या पत्नी अंजलीपेक्षा वयाने लहान आहे आणि असे असूनही या जोड्या लोकांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉप आहे. विश्वसुंदरी असलेली सुश्मिता सेनही 25 वर्षीय तरुणाला डेट करीत आहे.
जरी गीता कपूरचे वय आज 44 असले तरी ही ती आजही ग्लॅमरस, हॉट आणि सुंदर दिसते. गीता ज्या तरुणाला डेट करत आहे त्या तरुणाचं नाव राजीव खिंची असे आहे. राजीव खिंची हा देखील गीता प्रमाणेच कोरिओग्राफर आणि असिस्टंट दिग्दर्शक आहे.
गीतापेक्षा राजीव हा वयाने लहान आहे. गीता तिच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने कधी बोलली नाही. पण, सोशल मीडियावर प्रियकर राजीवसोबतचे फोटो शेअर करत तिने प्रेमाचा खुलासा केला आहे. लग्नाविषयी गीताला अनेकदा प्रश्न विचारण्यात आला आहे.
पण, लग्न कधी करणार असल्याची माहिती तिने अद्याप दिलेली नाही. या दोघांना त्यांच्या नात्याविषयी विचारले असता ”आम्ही फक्त चांगले मित्र आहोत” असं उत्तर देतात. मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टने लक्षात येते की ते दोघं डेट करत आहेत.