या साऊथच्या ऍक्टरने पत्नीला वाढदिवसाला दिले होते करोडोचे गिफ्ट, गाडी किव्हा दागिने नसून दिली ही गोष्ट

साऊथ चित्रपटामधील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर हा एक चांगला अभिनेता आहेच यात काही शंका नाही पण तो एक चांगला पती देखील आहे.तुमच्या माहिती साठी की ज्युनियर एनटीआर याची पत्नी लक्ष्मी प्रणति इच्छा आत्ता मागे वाढदिवस होता.या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने त्याच्या पत्नीला एक गिफ्ट दिले ज्याची किंमत करोडो मध्ये आहे.
बातमीच्या माहितीनुसार त्याने त्याच्या पत्नीला एक सुंदर असे फार्महाऊस गिफ्ट केलं आहे.हे फार्महाऊस हैद्राबाद मध्ये आहे.ज्युनिअर एनटीआर याच्या पत्नीचा वाढदिवस आत्ता मागे 18 तारीख ला होऊन गेला.पण अजून देखील या फार्महाऊस ची मूळ किंमत समोर अली नाही.पण असे मानले जात आहे की याची किंमत करोडो मध्ये आहे.
ज्युनिअर एनटीआर ने 5 मार्च 2011 ला लक्ष्मी प्रणति सोबत लग्न केले होते.तो आता 2 मुलांचा बाप आहे.मोठ्या मुलाचं नाव अभय आणि छोट्याच नाव भार्गव राम आहे. ज्युनिअर एनटीआर ने तेलगू चित्रपटातुन बालकलाकार म्हणून काम चालू केले होते.त्याचा पहिला चित्रपट 1996 मध्ये आला होता व त्यास राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
त्याचे आजोबा एनटी रामाराव आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री होते.त्यामुळे या अभिनेत्याचे नाव ज्युनिअर एनटीआर असे पडले होते. त्याच्या पुढील कामाविषयी बोलले तर तो लवकरच एसएस राजामौली स्टारर चित्रपट ‘RRR’ मध्ये दिसणार आहे.या चित्रपटात साऊथचाच सुपरस्टार रामचरण याच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
त्याच बरोबर तो त्याचा पुढील चित्रपटासाठी दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास याच्या सोबत हातमिळवणी करणार आहे.या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर सोबत रश्मीका मंदानाला घेतले जाऊ शकते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.