‘मन उडू उडू झालं’ मालिका धक्कादायक वळणावर, दीपूचा होणार गंभीर अपघात…

मन उडू उडू झालं ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे या मालिकेत आपण पहात आहोत की दिपू आणि इंद्रा हे दोघे मिळून सानिकाचा चोरओटी च्या कार्यक्रमाची खरेदी करणार असतात या खरेदीसाठी दिपू व इंद्राने जावे यास इंद्राची आई सहमती देते.
दिपू ची आई म्हणजे मालती या दोघांना एकत्र पाहते. दिपूला इंद्रा पासून दूर राहण्यासाठी मारुतीने बजावलेले असते.या मालिकेत आता एक नवीन वळण येणार आहे. या मालिकेत सानिकाने गरोदरपणाचे नाटक केल्याचं सत्य प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे. सानिका तिच्या वडिलांनी सासरी जाण्यास होकार द्यावा म्हणून ती प्रेग्नेंट असल्याचे घरात खोटे सांगते.
हे दिपू समोर कबूल करत सानिका म्हणते पळून जाऊन लग्न केले तर बाबा सासरी जाण्यास होकार देणार नाहीत ,हे मला माहिती होते म्हणून मी हे नाटक केले आहे .सर्वात प्रथम हे सत्य दिपू समोर येणार आहे. या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये घरातल्या सर्व सदस्यांना सानिका गरोदर नसल्याचं सत्य दिपू सांगणार आहे.
हे सत्य सांगू नये म्हणून सानिका दिपूला विनवणी करते, पण दिपू ऐकत नाही.सानिका दिपूला म्हणते की मी प्रेग्नेंट असल्याचे कळाल्यानंतर बाबांना अटॅक आला होता, आता मी प्रेग्नेंट नसल्याचे कळाल्यानंतर देखील बाबांना पुन्हा अटॅक आला तर तूच जबाबदार राहणार आहेस, तरीही दिपू सानिकाचे ऐकत नाही आणि घरातील सर्वांना सानिका विषयी चे सत्य सर्वांसमोर येणार आहे.
सध्या एक प्रोमो या मालिकेचा व्हायरल होत आहे . या प्रोमोमध्ये सानिका म्हणते आहे माहेरच्या सर्व सदस्यांना तुमचे आणि आमचे संबंध संपले असं म्हणत ती कार्तिकचा हात पकडून देशपांडे सरांच्या घरातून निघून जाते. म्हणजेच आपल्या आई-वडीलांच्या घरातून निघून जाते.
त्यानंतर दिपू कार्तिक च्या घरी जाऊन सानिका आणि कार्तिकला समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्या दरम्यान सानिका दिपू चे ऐकून न घेता तिला धक्का देते. सानिकाच्या या वर्तणुकीमुळे दगडाला अडखळून दिपूचा गंभीर अपघात होणार आहे. त्यानंतर सानिका दिपू जवळ जाते पण दिपू गंभीर जखमी झालेली असते.
सानिकाच्या हट्टीपणा मुळे दिपू च्या जीवावर बेतणार आहे. बहिणीवर च्या प्रेमाची सानिकाला होईल का जाणिव हे पाहणे आता आपल्याला औत्सुक्याचे ठरणार आहे.