‘तारक मेहता…’ च्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

‘तारक मेहता…’ च्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये अनेक कलाकार हे रातोरात सुपरस्टार झाली.

मात्र, गेल्या काही वर्षापासून अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. अलीकडेच तारक मेहता ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने देखील मालिका सोडल्याची बातमी आपण ऐकली असेल तर मध्यंतरी या मालिकेमध्ये अनेक कलाकार हे बदलले देखील गेले. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी हा कमालीचा घसरल्याचे पाहायला मिळाले.

मालिकेमध्ये आपल्याला जेठालाल यांची भूमिका अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारलेली दिसत आहे. तर मालिकेमध्ये चंपकलाल, टप्पू सेना, बबीता, अय्यर, सोडी भिडे मास्टर, अंजली भाभी यांच्यासह इतरांच्या भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दयाबेन ही भूमिका अतिशय लोकप्रिय झाली होती.

मात्र, तिने ही मालिका तीन ते चार वर्षांपूर्वी सोडली होती. गरोदरपणाचे कारण देत ही मालिका तिने सोडली होती. दयाबेन ही भूमिका अभिनेत्री दिशा वाकानी हिने साकारली होती. तिच्या अफलातून बोलण्याने तिने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते, तर तिने ही मालिका का सोडली अशी चर्चा त्यावेळेस देखील खूप मोठ्या प्रमाणात रंगली होती.

मात्र आता एक भयंकर बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर आपल्याला खरेच दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिला सुखरूप ठेवावे, अशीच प्रार्थना आपण देवाकडे कराल तर बातमी अशी आली आहे की, तारक मेहता. का उल्टा चश्मा मालिके साठी दायाबेन हिने आपला मूळ आवाज बदलून दुसऱ्या आवाजात चित्रीकरण केले.

आता अशा बोलण्यामुळेच दिशा वाकानी हिला घशाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. दिशा वाकानी ही जवळपास बारा बारा तास चित्रीकरण करायची आणि तिला वेगळ्या आवाजामध्ये बोलावे लागायचे आणि तिच्या या बोलण्यामुळेच तिला आता घशाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अजून दुजोरा मिळाला नसला तरी अनेक माध्यमांमधून सध्या अशाच बातम्या समोर आलेल्या आहेत, तर दिशा वाकानी हिच्याबद्दल आपले काय मत आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral