‘तारक मेहता’ या मालिकेच्या अगोदर या ‘बी ग्रेड’ चित्रपटात काम केले होते ‘दया बेन’ ने, दिसली होती बो ल्ड अवतारात !

‘तारक मेहता’ या मालिकेच्या अगोदर या ‘बी ग्रेड’ चित्रपटात काम केले होते ‘दया बेन’ ने, दिसली होती बो ल्ड अवतारात !

आज ‘दया बेन’ चा म्हणजे दिशा वकानीचा वाढदिवस आहे, जिने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या शोमधून प्रेक्षकांमध्ये तिची एक खास ओळख निर्माण केली. दिशा वकानी ही गुजरातमधील अहमदाबादची रहिवासी आहे. टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती नाटकांत काम करायची.

दिशाने बर्‍याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु तिची ओळख सबीटीव्हीवर येणार शो तारक मेहता का उलटा चष्मा यातून झाली. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पूर्वी दिशाची अभिनय कारकीर्द ही एकदम ढासळलेली होती. म्हणजे दिशाला प्रत्येक दिवशी चांगले काम मिळत नव्हते, आणि काम मिळाले तर त्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसे.

पैसे चांगले मिळणार असतील तर काम चांगले नसायचे. वर्ष 1997 मध्ये दिशाला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट बी ग्रेड चित्रपट होता. या चित्रपटाचे नाव होते- कमसिमः द अनटच. दिशाचा या चित्रपटात बो ल्ड अवतार दिसला होता.

या सिनेमात काम केल्यावर ती पुन्हा अशा भूमिकेत दिसली नाही, परंतु हो, दिशाने मोठ्या बॅनर चित्रपटांमध्ये साईड भूमिका साकारण्यास सुरुवात केली. दरम्यान, दिशाने संजय लीला भन्साळी यांच्या देवदास चित्रपटात पारोच्या सखीची भूमिका साकारली होती.

त्याचवेळी आमिर खानचा मंगल पांडेमध्ये सुद्धा अभिनेत्री यास्मीनच्या भूमिकेत ती दिसली होती. दिशा वकानी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा चित्रपट जोधा अकबरमध्येही दिसली होती. चित्रपटात दिशा माधवी बनली होती. फिल्म सी मध्ये तिने विधवेची भूमिका साकारली होती.

दिशा लव्ह स्टोरी 2050 या प्रियांका चोप्राच्या चित्रपटात मेडच्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान, दिशाने 2004 मधील खिचडि टीव्ही शोमध्ये देखील काम केले होते. 2005 मध्ये, दिशा इन्स्टंट खिचडीमध्ये दिसली. याशिवाय दिशा आहाट मध्ये देखील दिसली होती. त्यानंतर वर्ष 2008 मध्ये दिशा तारक मेहतामध्ये दिसली, त्यानंतर ती प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral