लग्न झाल्याचा दिव्या यांना करायचा होता खुलासा, पण ‘या’ भीतीनं पतीनं केलं होतं गप्प

लग्न झाल्याचा दिव्या यांना करायचा होता खुलासा, पण ‘या’ भीतीनं पतीनं केलं होतं गप्प

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती यांचा ५ एप्रिल १९९३ रोजी घराच्या बाल्कनीमधून पडून दिव्या यांचा मृ’ त्यू झाला होता. दिव्या यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं तेव्हा लोक केवळ त्यांच्या अभिनयाचेच नाही तर निरागस लुकचेही चाहते होते. कमी वयात दिव्या यांना प्रचंड यश मिळालं होतं. पण त्यावेळी हे यश साजरं करण्यासाठी आपल्याकडे फार कमी वेळ आहे हे मात्र त्यांना माहीत नव्हतं.

दिव्या भारती यांच्या अशा अचानक झालेल्या नि’ध ‘ना’नं बॉलिवूडला सर्वात मोठा धक्का बसला होता आणि तेव्हा पासून आज २८ वर्षांनंतरही दिव्या भारती यांचा मृ ‘त्यू सर्वांसाठी एक मि स्ट्री होऊन राहिला आहे. दिव्या भारती यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबई येथे झाला होता. ९ व्या इयत्तेपर्यंत शिकल्यानंतर दिव्या यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं.

सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९२ मध्ये दिव्या यांना सनी देओल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या ‘विश्वात्मा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि याच वर्षात त्यांचे ‘दिल का क्या कसूर’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना’, ‘जान से प्यारा’, ‘बलवान’, ‘दुश्मन जमाना’, ‘गीत’ आणि ‘दिल ही तो है’ हे चित्रपट एका मागोमाग एक रिलीज झाले.

१९९० मध्ये जेव्हा फिल्मसिटी येथे गोविंदा आणि दिव्या भारती ‘शोला और शबनम’ चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी साजिद नाडियाडवाला त्या ठिकाणी गोविंदा यांना भेटण्यासाठी गेले होते. याच वेळी गोविंदा यांनी दिव्या आणि साजिद यांची ओळख करून दिली होती. त्यानंतर साजिद रोज सेटवर येऊ लागले आणि दिव्या यांच्यासोबत त्यांची जवळीक वाढत गेली आणि दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

साजिद आणि दिव्या यांनी १० मे १९९२ रोजी लग्न केलं. दिव्या यांनी इस्लाम कबुल केला आणि स्वतःचं नाव बदलून सना नाडियाडवाला असं ठेवलं. साजिद यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘आम्ही लग्नाबाबत सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. कारण त्यावेळी दिव्याचं करिअर संपलं असतं.

जर ती विवाहित आहे हे समजलं असतं तर निर्मात्यांनी भीतीनं स्वतःच्या चित्रपटातून तिला काढून टाकलं असतं. दिव्याला नेहमीच आमच्या लग्नाबाबत सर्वांना सांगायचं होतं. पण मी नेहमीच तिला असं करण्यास नकार दिला होता.’ लग्नानंतर वर्षभरात म्हणजे ५ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या १९ व्या वर्षीच दिव्या यांनी या जगाला अलविदा केलं.

काही लोकांनी या घटनेला आ ‘त्म’ ह’ त्या मानलं तर काहींनी ही ह’ त्या असल्याचं म्हणत याचा दोष साजिद यांना दिला. दिव्या यांच्या नि’ध’ ना’नं बॉलिवूड इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला होता. नि ‘ध’ ना आधी दिव्या यांनी तब्बल ९२ चित्रपट साइन केले होते. दिव्या यांचा मृ’ त्यू आजही सर्वांसाठी एक न उलगडलेलं कोडं आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral