Divya Bharti ने ‘ती’ डील केली नसती तर आज असते जिवंत, मृत्यूच्या काही तासांपूर्वी घडले होते असे काही

1990 मध्ये जेव्हा गोविंदा आणि दिव्या भारती फिल्मसिटी मध्ये शोला और शबनम ची शूटिंग करत होते,तेव्हा साजिद त्याचा मित्र गोविंद ला भेटण्यासाठी सेट वर गेले. गोविंदाने देखील दोघांची पहिल्यांदा भेट घालून दिली होती.पाहता पाहता साजिद रोजच सेट वर यायला लागले होते.
एका मूलखतीमध्ये साजिद ने सांगितले की 15 जानेवारी 1992 ला दिव्याने लग्न करण्याची अट घातली होती. ती तिचे नाव दुसऱ्या अभिनेत्याबरोबर लावत असल्याने ती खूप वैतागून गेली होती. या सर्व गोष्टीला लवकर संपवण्यासाठी तीला लवकरात लवकर लग्न करायचे होते. 20 मे 1992 मध्ये हेयर ड्रेसर संध्या आणि तिच्या पतीच्या उपस्तिथी मध्ये दिव्या आणि साजिदचे लग्न झाले होते.
साजिद च्या वर्सोवा मधील तुलसी अपार्टमेंट मध्ये काजीने त्यांचे लग्न लावून दिले होते.दिव्याने लग्नाच्या आधी इस्लाम कबूल आणि तिचे नाव बदलून सना असे ठेवले होते. साजिद ने एका मूलखतीमध्ये सांगितले की आम्ही आमच्या लग्नाची गोष्ट लपवून ठेवली होती कारण दिव्याच करिअर महत्वाचं होत. ही गोष्ट बाहेर आली असती तर सगळे प्रोड्युसर आश्चर्यचकित झाले असते.
पण तरी सुद्धा या उलट मला असे वाटायचे की आम्हाला ही गोष्ट सगळ्यांना सांगावी. दिव्याने ज्या दिवशी जगाचा शेवटचा निरोप घेतला त्या दिवशी तिने एक स्वतःसाठी एका नवीन अपार्टमेंटची डील वर सही केली होती. ती चेन्नई वरून एका चित्रपटाच्या शूटिंग वरून अली होती व नंतर तिला हैदराबादला जायचे होते. आणि या नवीन अपार्टमेंट च्या डील मुळेच हैद्राबाद जाण्याचं तिने थोडं पोस्ट पौंड केलं होतं.
आणि त्या दिवशी दिव्याच्या पायाला लागलेलं होत व या बाबतीत तिने तिच्या दिग्दर्शकास पूर्वकल्पना देखील दिली होती. शूटिंग रद्द केल्यानंतर दिव्याला तिची डिझायनर नीता लुल्ला चा फोन आला व तिने आणि नीताने मिळून तिच्या पूढील चित्रपटासाठी एक नवीन ड्रेस फिक्स केला. निता सोबत तिचा पती डॉ.शाम लुल्ला देखील दिव्याच्या वर्सोवा फ्लॅट वर आले होते.
नीता आणि तिचे पती जवळ जवळ 10 वाजता दिव्याच्या फ्लॅट वर आले होते.तिघे लिविंग रूम मध्ये बसून बोलत होते आणि दा’ रू पित होते. त्यावेळी दिव्याच्या फ्लॅट वर काम करणारी अमृता देखील तिथेच होती.बोलणं चालू असताना अमृता किचन मध्ये गेली व दिव्या खिडकी च्या दिशेने वळाली.
या वेळी नीता लुल्ला तिच्या पतीसोबत लिविंग रूम मध्येच एक व्हिडिओ पाहत होते.इमारतीच्या बाकी खिडक्यासाखरेच या खिडक्यांना देखील ग्रील नव्हते लावलेले.खिडकीच्या खाली पार्किंग एरिया होता पण त्यादिवशी तिथे कोणती गाडी नव्हती.
काही वेळाकरिता दिव्या त्या खिडकीमध्ये च मोकळ्या हवेला बसली होती व नंतर ती लिविंग रूम मध्ये येण्यासाठी वळाली तेव्हा तिचा बॅलन्स बिघडला व ती सरळ पाचव्या मजल्यावरून खाली पडली. इमारतीवरून पडल्यानंतर दिव्या खूप र’ क्ताने भिजली होती पण तिचा श्वास चालू होता,हॉस्पिटलमध्ये नेताना तिची प्रकृती अचानक खालावली व कुपुर हॉस्पिटलमध्ये तिने शेवटचा श्वास घेतला.